शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पाऊस नाही, मजुरी नाही; मग पोटाकरिता गाठतो मुंबई

By admin | Updated: April 15, 2016 01:25 IST

गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच.

- स्रेहा पावसकर,  ठाणे गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच. त्याच्या आधारावर घरखर्च, मुलांचे शिक्षण कसे होणार, कर्ज कसे फिटणार? आणि बचत ती काय होणार? दिवाळीनंतर तर हाताला कामच नाही? निव्वळ बसून करायचे काय? अशा असंख्य समस्यांचा सामना करीत असलेल्यांनी पोटाची वितभर खळगी भरण्याकरिता ठाण्यातील रामनगर परिसरातील मदत छावणीत आसरा घेतला आहे. नांदेड, लातूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांनी आपल्या व्यथा भरभरून सांगितल्या.नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सुमारे २०० दुष्काळग्रस्त सध्या या छावणीत वास्तव्याला आहेत. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आठ दिवसांतून एकदा टँकर येतो, पण तोही गावात. रानमाळावर राहणाऱ्या लोकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचतच नाही. पाण्याअभावी शेती करपून गेली. याही परिस्थितीत कुणी शेती केलीच तरी पिकं चांगली येत नाही. पाणी विकत घ्यायचे म्हटले तर २ रुपये १ घागर असा सध्या भाव सुरू असल्याचे बाराळी गावातील दुष्काळग्रस्त बजरंग चव्हाण यांनी सांगितले. ज्यांच्याकडे बोअरने थोडेफार पाणी येते. अशांच्या शेतात मजुरी करायची म्हटले तरी ती रोज मिळत नाही. त्यामुळे घरातील वयोवृद्ध आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांना मागे ठेवून रोजगारासाठी आम्ही मुंबई गाठतो. इथे इमारत बांधकाम, पेव्हरब्लॉक बसवणे, कचरा साफ करणे अशाप्रकारे २०० ते ३०० रुपये रोजंदारीवर काम केल्यावर अन्नधान्याचा खर्च वगळता उरलेले पैसे गावी पाठवतो, असे अनेकांनी सांगितले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे आल्यावर ३-४ महिने रोजंदारी करतो आणि पाऊस आल्यावर पुन्हा गावाकडे जातो. काहींनी दरवर्षी येणेजाणे टाळण्याकरिता मुंबईतच संसार थाटला, असे गुजाबाई चव्हाण यांनी सांगितले. छावणीत असलेल्यांपैकी काही प्रथमच मुंबईत आले असले तरी अनेकजण सलग २-३ वर्षे याच काळात येत आहेत. त्यामुळे बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे त्यांचेही स्थलांतर सुरू आहे.यंदा प्रसिद्धिमाध्यमातून मुखेड तालुक्याची परिस्थिती समजल्यावर आमच्या गावात असलेल्या माणसांना दोन-तीन दिवसाआड का होईना, पण टँंकरचे पाणी मिळू लागल्याचेही त्यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण असल्यामुळे त्यांना तेथेच सोडून येतो. त्यांनी भरपूर शिकून चांगली नोकरी करावी. त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नकार्यासाठी जास्तीतजास्त पैसे बचत करावेसे वाटतात, असे सुशीलाबाई राठोड यांनी सांगितले. जनावरे दिली सोयऱ्यांकडेमाणसांना पिण्यासाठी पाणी नाही. अशावेळी जनावरांसाठी पाणी,चारा मिळवणे कठीण असते. त्यातच आता रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबईला आल्यावर जनावरांना नातेवाइकांच्या घरी त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करून आलो आहोत, असेही येथील लोकांनी सांगितले.सामाजिक संस्था, नागरिकही सरसावलेमुंबईत आणि नंतर ठाण्यात स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत केली. विदर्भ समाज संघ, शेअर सामाजिक संस्था, भोजा एज्युकेशनल आणि सोशल ट्रस्ट यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने तर कोणी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर, काही सर्वसामान्य ठाणेकरांनी या छावणीमध्ये उत्स्फूर्तपणे धान्य,कपड्यांचे वाटपही केले.