शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांसाठी एकही योजना नाही

By admin | Updated: May 24, 2017 01:02 IST

स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी सफाई कामगार काम करतो. मात्र त्यांच्यासाठी महापालिकेने एकही योजना राबवली

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी सफाई कामगार काम करतो. मात्र त्यांच्यासाठी महापालिकेने एकही योजना राबवली नसल्याची खंत राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली. सफाई कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आयोगाला पालिकेच्या अनास्थेचे दर्शन घडले असून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी कुठली योजना राबवते. तसेच सरकारच्या विविध योजनेचा कितपत लाभ घेते, याचा आढावा घेण्यासाठी आयोगाने महापालिकेचा दौरा केला होता. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे, अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, कामगार नेते चरणसिंग करोतिलया, राधाकृष्ठ साठे, राजेंद्र अंडागळे, कन्नू करोतिया, दिलीप थोरात यांच्यासह सफाई कामगारांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. सफाई कामगारांसाठी आजपर्यंत किती घरे बांधून दिली. या प्रश्नाचे उत्तर पालिका आयुक्त देऊ शकले नाही. यावेळी पालिकेच्या विविध योजनेचा बुरखा आयोगाने फाडला.महापालिकेच्या लोकसंख्येनुसार २५०० पेक्षा अधिक सफाई कामगार हवेत. मात्र प्रत्यक्षात १२५० सफाई कामगार आहेत. १५ वर्षापासून ३०५ कंत्राटी कामगारांना पालिका सेवेत नियमित करण्याचे न्यायालयासह राज्य सरकारचे आदेश असताना त्यांना पालिका सेवेत घेतलेले नाही. याबाबत आयोगाने नाराजी व्यक्त केली. तसेच पदोन्नतीचा प्रश्न अनेक वर्षापासून धूळखात आहे. सफाई कामगारांच्या विकासासाठी अंदाजपत्रकाच्या ५ टक्के रक्कम राखीव ठेवण्याचा नियम आहे. मात्र ४० वर्षाच्या इतिहासात सफाई कामगारांसाठी एकही योजना राबवली नाही. तसेच कायमस्वरूपी मालकीचे घर दिले नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारकडून सफाई कामगारांसाठी विविध योजनेद्बारे अनुदान येते. मात्र किती अनुदान त्यांच्यासाठी खर्च झाले, किती परत गेले याचे आॅडिट होत नाही. त्याचे विशेष आॅडिट करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. १० वर्ष बंद पडलेला सफाई आयोग पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्याची महिती त्यांनी दिली. सफाई कामगारांसाठी राबवत असलेल्या योजना, अधिकारी राबवत नसल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. मात्र आता पर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले.