शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘क्लस्टर’मध्ये कुणावरही अन्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:38 IST

सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्र्यांची ग्वाही : हाजुरीवासीयांच्या शंकांचे केले निराकरण

ठाणे : ठाण्यात क्लस्टर (समूह विकास) योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी हाजुरी भागात रविवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत क्लस्टर योजनेत कुणावरही अन्याय होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत हाजुरीवासीयांच्या विविध शंकांचे निराकरण करण्यात आल्याने ठाण्यातील क्लस्टर योजनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ठाण्यात क्लस्टर (समूह विकास) योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि मालकी हक्काची घरे मिळावीत, यादृष्टीने ठाणे मनपा प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू असताना हाजुरी भागातील काही नागरिकांनी या योजनेला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर क्लस्टरबाबत असलेल्या गैरसमजांसह नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी रविवारी हाजुरी परिसरातील जवाहर ज्योती गृहसंकुलाच्या आवारात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि क्लस्टरचे तांत्रिक सल्लागार संजय देशमुख यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. देशमुख यांनी क्लस्टर योजनेबाबत इत्थंभूत माहिती देऊन विविध शंकांचे निराकरण केले.

पालकमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, धोकादायक घरांत राहणाऱ्या तसेच झोपड्यांमध्ये राहणाºया प्रत्येक रहिवाशाला हक्काचे घर मिळावे, यासाठीच क्लस्टर योजना आणली असून तब्बल १५ वर्षे यासाठी रस्त्यावर आणि सभागृहात लढा दिला. हाजुरी परिसरातच सुमारे १३ इमारती आणि २००० झोपडपट्टीवासीयांचा समावेश आहे. यामधील अनेक इमारती धोकादायक बनल्या असून त्यांना सुरक्षित निवारा गरजेचा आहे. योजनेत कुणावरही अन्याय होणार नाही. प्रत्येकाला हक्काचा निवारा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कुणीही रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सीमांकन करण्यासाठी सर्वेक्षण आवश्यकठाणे शहरासाठी क्लस्टर योजनेचे एकूण ४४ आराखडे तयार करण्यात आले असून जवळपास १४८९ हेक्टर क्षेत्र या योजनेंतर्गत विकसित होणार आहे. यासाठी शासनाने उच्चाधिकार समिती नेमली असून या समितीने ठाण्यातील कोपरी, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, किसननगर आणि लोकमान्यनगर या एकूण सहा आराखड्यांमध्ये क्लस्टर योजना राबवण्याचे निश्चित केले आहे.यातील गावठाण-कोळीवाड्यातील रहिवाशांनी विरोध दर्शवून सर्वेक्षण रोखून आधी सीमांकन करण्याची मागणी केली. त्यानुसार, शासनाने येथील नागरिकांची इच्छा नसेल, तर त्यांना वगळण्यात येईल, अशी भूमिका मांडली. परंतु, सर्वेक्षणच झाले नाही, तर सीमांकन कसे करणार, असा प्रश्न तांत्रिक सल्लागार संजय देशमुख यांनी बैठकीत करताच नागरिकांनी सर्वेक्षणाला सहमती दर्शवली आहे.सहकार्याचे आवाहनहाजुरी येथील क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ९५ टक्के नागरिकांनी सहमती दर्शवली. त्यानुसार, जीआयएस प्रणाली, लेझर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या लॅण्डर तंत्रज्ञानाद्वारे आणि ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तांत्रिक सल्लागारांनी दिली असून सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.