शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या प्रभाग प्रारूप यादीचा पत्ताच नाही

By admin | Updated: June 28, 2017 03:16 IST

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असताना अद्याप महापालिकेने मतदारांची प्रारुप यादीच प्रसिध्द केली नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने प्रारुप यादीच प्रसिध्द न केल्याने त्यावर हरकती, सूचना घेण्याची मुदत कमी होणार आहे. मीरा- भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १३ जून रोजी प्रसिध्द झालेल्या विधानसभा मतदारयादीचा वापर महापालिका निवडणुकीसाठी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आयोगाने दोन जून रोजी आदेश काढून ५ जानेवारी ते १३ जून दरम्यान मतदारनोंदणी अधिकारी यांनी दाखल केलेली नवीन नावे व दुरुस्त्या महापालिकेने प्राप्त करून मतदारांचे प्रभागानुसार विभाजन करण्यास आयोगाने सांगितले हते. मीरा- भार्इंदर महापालिकेला प्रभाग निहाय प्रारूप यादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्यास सांगितले होते. तर ७ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर २५ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना द्यायच्या आहेत. हरकती वा सूचनांमध्ये केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा चुकून झालेला समावेश तसेच विधानसभा मतदारयादीत नाव असताना प्रभागाच्या यादीत वगळले असल्यास त्याचा समावेश करुन घेणे या दुरुस्त्या करता येणार आहेत. मुदत उलटून दोन दिवस उलटले तरी मीरा- भार्इंदर महापालिकेने अद्यापही प्रारूप यादीच जाहीर केलेली नाही. वास्तविक महापालिकेने आयोगाच्या आदेशानुसार २५ जून रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय व अन्य कार्यालयांमधील सूचनाफलकांवर तसेच पालिकेचे संकेतस्थळ, वृत्तपत्र व केबलवाहिनीवर प्रसिध्द करणे आवश्यक होते. पण २६ जून होऊनही अजून महापालिकेने प्रारूप यादीच प्रसिध्द केलेली नाही. पालिकेच्या या सावळ्यागोंधळामुळे निवडणूक आयोगाचे आदेश केराच्या टोपलीत गेले आहेत. शिवाय मतदारयादीबाबत हरकती, सूचना घेण्याची मुदत १ जुलै पर्यंत असली तरी यादीच प्रसिध्द न झाल्याने प्रारूपयादीत नव्याने दाखल नावे, दुरूस्त्या यांची काटेकोर छाननी करण्यास इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांना कमी दिवस मिळणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५० हजार नवीन नावे मतदारयादीत नोंदवण्यात आली आहेत.