शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आता टॉप-२० गुंडांचीही यादी तयार

By admin | Updated: March 1, 2016 02:28 IST

शहरात शांतता राखण्यासाठी शहर पोलिसांनी नवा फंडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या स्थानिक गुंडांची टॉप-२० यादी तयार करण्याचे

पंकज रोडेकर,  ठाणेशहरात शांतता राखण्यासाठी शहर पोलिसांनी नवा फंडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या स्थानिक गुंडांची टॉप-२० यादी तयार करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर यादीचे काम सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे गुंडांची यादी करणारे शहर पोलीस दल हे जिल्ह्यातील बहुधा पहिलेच दल ठरणार आहे.मध्यंतरीच्या काळात मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांत धूम स्टाइलने सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे महिलांमध्ये त्यांची दहशत पसरली होती. याचदरम्यान, त्या चोरट्यांवर वचक बसवण्यासाठी शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांची टॉप-२० यादी तयार केली. त्यानुसार, या चोरट्यांविरोधात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कारवाई हाती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे आयुक्तालयात सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे ठाणेकरांना कळतनकळत होणारा त्रास किंवा भविष्यात अशा प्रकारच्या घटनांत वाढ होऊ नये तसेच अशा प्रकारच्या लोकांमुळे शांतता भंग होऊ नये आणि त्यांच्यावर वेळीच अंकुश ठेवण्यासाठी त्या गुंडांची यादी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तालयात शांतता राखण्यासाठी स्थानिक पोलीस ही यादी तयार करण्यास लागल्याचे सूत्रांनी सांगितले