शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

...तर नेवाळीची पुनरावृत्ती घडेल, संतोष केणे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:20 IST

आयरेगाव परिसरातील जमीनमालक आणि रहिवासी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून काही व्यक्ती शांतता आणि कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.

डोंबिवली : आयरेगाव परिसरातील जमीनमालक आणि रहिवासी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून काही व्यक्ती शांतता आणि कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीसही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भूमिपुत्रांना त्रास देत आहे. आगरी समाजाने संयम सुटल्यास नेवाळीची पुनरावृत्ती घडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक तथा आयरेगाव भूमिपुत्र जनहित संस्थेचे सल्लागार संतोष केणे यांनी दिला.डोंबिवलीतील आगरी समाज सभागृहात रविवारी आगरी-कोळी भूमिपुत्रांसह घरमालक व रहिवाशांची विशेष सभा झाली. यावेळी केणे बोलत होते. मंचावर विलास म्हात्रे, गिरीश साळगावकर, गजानन पाटील, मोतीराम गोंधळी, विकास देसले, काळू कोमास्कर, गोविंद भगत, गणेश म्हात्रे, अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सुशीला केणे आदी मान्यवर उपस्थित होते.आयरेगाव येथील इमारतींमधील रहिवाशांकडून पैसे उकळणे आणि इमारतमालकांना मानसिक त्रास देऊन रहिवासी आणि मालक यांच्यात वाद निर्माण करण्याचे कारस्थान काही मंडळी करत असल्याचा आरोप भूमिपुत्र जनहित संस्थेने केला आहे. त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.केणे पुढे म्हणाले की, मालक आणि रहिवासी ४० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण, काही विघ्नसंतोषी मालक आणि रहिवाशांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजकंटकांकडून मतांचे राजकारण सुरू आहे. धोकादायक इमारती, चाळींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर व म्हाडाच्या धर्तीवर गृहनिर्माण योजनेसारख्या अनेक वादग्रस्त मागण्या करून येथील आगरी-कोळी स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव रचला जात आहे. पोलिसांकडे याबाबत निवेदन देऊनही ते शांत आहेत, उलट भूमिपुत्रांना नोटिसा दिल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत केणे यांनी आपले मत व्यक्त केले.लोकभावना भडकावणे, त्यांची मने कलुषित करणे आणि जेणेकरून आपापसात भांडणे होतील, यासाठी हे सर्व सुरू आहे. इथले रहिवासी आणि मालक यांच्यात कुठलाही वाद नाही. भविष्यातही आम्ही एकत्रच राहणार, विकास दोघांचाही होणार, याची आम्ही ग्वाही देतो, असे अ‍ॅड. भारद्वाज चौधरी यांनी सांगितले. रहिवासी व मालक या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही जण राजकीय षड्यंत्र रचले गेले, तरी ते यशस्वी होणार नाही, असे गणेश म्हात्रे म्हणाले. तर, मालकाची भूमिका ही सामोपचाराची राहिलेली असून भाडेकरूंचे हक्क अबाधित ठेवून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत काळू कोमास्कर यांनी मांडले.>शाश्वत विकास हवाक्लस्टर म्हणजे समूह विकास, पण क्लस्टर या चांगल्या शब्दाचा वापर करून वाईट व्यवस्था राबवली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. समूह विकास हा माणसांनी माणसांसाठी केलेला विकास असतो. त्यात माणसांना योगदान देता आले नाही, तर त्याचा फायदा नाही. भूमिपुत्र सुशिक्षित आहे. त्याला शाश्वत विकास कळतो, त्यामुळे आपल्याबरोबर राहणाºया भाडेकरूला माणूस हा दर्जा देऊन त्याचा विकास कसा करता येईल, याचा तो विचार करतो, असे गिरीश साळगावकर म्हणाले.