शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

खारीगावातील ग्रामस्थांचा रंगमंच, हॉलला पालिकेचे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:28 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने खारीगाव ग्रामस्थांच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या वापरातील रंगमंच तसेच हॉलला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. गावातले आजीमाजी तब्बल नऊ नगरसेवक असूनही सील ठोकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

- धीरज परबमीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने खारीगाव ग्रामस्थांच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या वापरातील रंगमंच तसेच हॉलला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. गावातले आजीमाजी तब्बल नऊ नगरसेवक असूनही सील ठोकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. याशिवाय धारावी मंदिर, घोडबंदर, मोर्वा, राई, पेणकरपाडा, नवघर, डोंगरी, मुर्धा, मोर्वा येथील समाजमंदिर, व्यायामशाळा, आखाडा आदी १४ मालमत्तांनासुद्धा सील ठोकण्याची तयारी पालिकेने केली आहे. बाजारभावाप्रमाणे भाडे आकारण्यासाठी पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.भार्इंदर पूर्वेच्या खारीगावात स्थानिक आगरी समाजाचे सत्यनारायण मंदिर आहे. जवळच महापालिकेच्या नगरसेवक निधीतून रंगमंच आणि एक मजली लहान हॉल बांधण्यात आला आहे. रंगमंचाचा वापर गावातील यात्रा वा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होतो. लहान हॉल ग्रामस्थ विविध कार्यक्रमांसाठी उपयोगात आणतात. अनेक वर्षांपासून सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या ताब्यात सदर मालमत्ता आहे. शुक्रवारी महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात लहान हॉलला सील ठोकले आहे. रंगमंच मोकळा असला, तरी त्यालादेखील प्रातिनिधिक सील ठोकले आहे. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत भोईरसुद्धा उपस्थित होते. गावातले विद्यमान चार आणि माजी पाच असे नऊ आजीमाजी नगरसेवक असताना सील ठोकल्याने गावात अस्वस्थता पसरली आहे. ही जागा पालिकेच्या नाही तर ग्रामस्थांच्या मालकीची आहे. पालिकेने नगरसेवक निधीतून बेकायदा बांधकाम केले आहे. याविरोधात कायदेशीर लढा देण्यास आपण समर्थ आहोत, असे माजी सभापती तथा सत्यनारायण मंदिरचे ट्रस्टी मोहन पाटील यांनी सांगितले.दरम्यान, पालिकेने आपल्या मालमत्ता या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सदर मालमत्ता भाड्याने देण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या. पण, अवास्तव भाड्याच्या मागणीमुळे प्रतिसाद मिळाला नाही. ही मालमत्ता कोणत्याही संस्थेकडे दिली नसल्याने पालिकेने कारवाई सुरू केली.मुळात बहुतांशी मालमत्तांचा वाणिज्य वापरच होत नसून सामाजिक, सांस्कृतिक, कामांसाठी त्याचा वापर केला जातो आहे. आंबेडकरनगर येथे समाजमंदिरात कुस्तीचा आखाडा अनेक वर्षे सुरू आहे. तर, अनेक ठिकाणी व्यायामशाळा चालवल्या जात आहेत. वास्तविक, बहुतांश जागांची मालकी पालिकेची नसतानाही बांधकामे केली आहेत आणि पालिका सदर मालमत्ता आपली असल्याचा दावा करते आहे. ही मालमत्ता स्थानिकांच्या वापरात असून त्यांना हुसकावण्याचा घाट पालिकेने कोणाचा इशाऱ्यावरून घातला आहे, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.भाड्यासाठी प्रतिसाद नाहीशासन आदेशानुसार पालिकेच्या मालमत्ता रेडीरेकनरच्या दराने भाड्याने देणे बंधनकारक आहे. पण, भाड्याने घेण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्याने आदेशानुसार पालिकेने मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सील ठोकण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे