शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बकरा प्रकरणात रहिवाश्यांवर गुन्हा नोंदवणाऱ्या महिलेच्या पतीवर देखील विनयभंगाचा गुन्हा

By धीरज परब | Updated: June 29, 2023 23:19 IST

संकुलातील एस्टेला इमारतीत  राहणाऱ्या मोहसीन खान यांनी ईद निमित्त घरात बकरे आणून ठेवले होते .

मीरारोड - ईद निमित्त घरात बकरे आणले म्हणून धार्मिक स्वरूप देऊन तणाव निर्माण झालेल्या मीरारोडच्या जे पी नॉर्थ ह्या गृहसंकुलातल्या ४१ ते ५१ रहिवाश्यांवर महिलेच्या फिर्यादी नंतर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला होता . आता ६३ वर्षीय रहिवाशी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून त्या महिलेच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे दाखल करण्यात आला आहे . 

संकुलातील एस्टेला इमारतीत  राहणाऱ्या मोहसीन खान यांनी ईद निमित्त घरात बकरे आणून ठेवले होते . मंगळवारी रात्री रहिवाश्यांच्या जमावाने  त्यांची गाडी जबरदस्तीने अडवून तपासणी केली . घरात ठेवलेला बकरा काढा सांगत मोहसीन ला धक्काबुक्की केली . त्यांची पत्नी यास्मिनचा हात धरून कपडे फाडले अश्या फिर्यादी वरून पोलिसांनी ४१ ते ५१ जणांवर दंगल , विनयभंग आदी बाबत गुन्हा दाखल केला .

मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटे पर्यंत बकरा घरात ठेवला म्हणून रहिवाशी मोठ्या संख्येने जमून हनुमान चालीसा म्हणत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना धक्काबुक्की रहिवाश्यांनी केली .  धार्मिक तेढ तणावाचे वातावरण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

यास्मिन यांच्या फिर्यादी वरून बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्या ने रहिवाशी देखील काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यां सोबत पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा पर्यंत जमले . गुरुवारी पहाटे ६३ वर्षीय महिलेच्या तक्रारी वरून मोहसीन वर सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला आहे . दोन्ही गुन्ह्यांचा पोलीस तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज , व्हिडीओ पडताळले जात आहेत .