शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या निवडणुकीत  महायुतीने खरे नरेटिव्ह तयार करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Updated: June 16, 2024 22:50 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा रविवारी सायंकाळी पार पडला.

ठाणे : लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचे खरे नरेटिव्ह तयार करून विजय मिळवावा. त्यासाठी या निवडणुकीची महत्वाची भूमिका असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. लोकसभेनंतर होणारी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे, असे या मेळाव्यात नमूद करून महायुतीच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहता कार्य करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कोकणातील कार्यकर्त्यांच्या ताकदीने निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीच्या मुंबईतील दोन व नाशिकच्या उमेदवारांचाही मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा रविवारी सायंकाळी पार पडला.  या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, हेमंत सवरा, आमदार मंदा म्हात्रे, रमेश पाटील, गीता जैन, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रशांत ठाकूर, मनिषा कायंदे, माजी खासदार आनंद परांजपे, राजेंद्र गावित, माजी आमदार रविंद्र फाटक, संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मनसेचे पदाधिकारी अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आरपीआयचे भास्कर वाघमारे, भाजपाचे संजय वाघुले, शिवसेनेचे गोपाळ लांडगे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे संकल्पपत्र असलेल्या `व्हिजन डॉक्युमेंट'चे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले असले, तरी राज्यात महायुतीला लक्षणीय मते मिळाली. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाली. आता या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कामे जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच लोकसभा निवडणुकीत काही एनजीओंनीही महाविकास आघाडीच्या साह्याने नरेटिव्ह निर्माण केले. मोदी द्वेषाने पछाडलेल्या काही एनजीओंमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले आहेत, असा आरोप  शिंदे यांनी केला. आमदार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून, कोकणाने त्यांना तडीपार केले. कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या. आता या निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आमदार निरंजन डावखरे यांनी १२ वर्षांत पदवीधरांबरोबरच विविध विकासकामे केली. त्याचबरोबर विद्यार्थीभिमुख भूमिका घेऊन विविध प्रश्न सोडविले. विधिमंडळातही ते सतत प्रश्न मांडण्यात आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी करून पुन्हा डावखरेंना विजयी करण्याचे आवाहन केले.मुंबईतील दोन, कोकण आणि नाशिकमध्ये भाजपासह महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस