शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीने ठाणेकर गारठले

By admin | Updated: December 24, 2015 01:42 IST

झपाट्याने घसरलेले तापमान आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे मंगळवारी ठाणेकर गारठले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान झपाट्याने कमी होत १३ अंश सेल्सियसवर पोचल्याने मंगळवारची रात्र ठाणे

ठाणे : झपाट्याने घसरलेले तापमान आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे मंगळवारी ठाणेकर गारठले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान झपाट्याने कमी होत १३ अंश सेल्सियसवर पोचल्याने मंगळवारची रात्र ठाणे, कल्याण-डोंबिवलीकरांनी कुडकुडत काढली. ग्रामीण भागात तर यापेक्षाही कमी म्हणजे ११ ते १२ अंश सेल्सियस असे कमी तापमान नोंदविले गेले. गेल्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवतो आहे. शुक्रवारी १४ अंशांवर पोचलेले तापमान शनिवार-रविवारी थोडे वाढले, पण वातावरणात आल्हाददायक गारवा होता. मंगळवारी मात्र दुपारपासूनच बोचरे वारे वाहू लागल्याने तापमान झपाट्याने कमी झाले. दिवसाच्या तापमानातही घट होऊन ते ३२ ते ३३ अंश सेल्सियसवरून थेट २९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे शाली, स्वेटर, मफलर, कानटोप्या असा थंडीचा जामानिमा केलेली मंडळी मॉर्निंग वॉकला दिसत होती. रंगीबेरंगी जॅकेट, ब्लेझर्स, स्कार्फमधील तरूणाईही लक्ष वेधून घेत होती.कल्याण-डोंबिवली परिसरातही गेल्या दोन दिवसांच्या गुलाबी थंडीच्या तुलनेने मंगळवारी नागरिकांना कुडकुडणाऱ्या थंडीचा अनुभव घेता आला. तेथील तापमानही १३ अंशांपर्यंत खाली घसरले. शहरांच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तापमानात तर आणखी घट झाली. भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ-बदलापूरचा परिसर, कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग थंडीने आणखी गारठला. तेथील तापमान ११ ते १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते.