शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तरुणाला विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 02:55 IST

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच यातील आकाश शाहू (२२, रा. किसननगर, ठाणे) याच्यासह दोघांना सोमवारी ताब्यात घेतल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली.

ठाणे : वागळे इस्टेट परिसरात दहशत माजवण्यासाठी सहा गुंडांनी १९ वर्षीय तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना किसननगर येथील भटवाडी भागात घडली. यावेळी त्याचा व्हिडिओदेखील बनविण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच यातील आकाश शाहू (२२, रा. किसननगर, ठाणे) याच्यासह दोघांना सोमवारी ताब्यात घेतल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली. यातील अन्य चौघांचाही शोध घेण्यात येत आहे.माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ठाण्यातील किसननगर भागात अलिकडेच घडली. या तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला विवस्त्र करीत. त्याचा व्हिडिओ आकाश याच्यासह सहा जणांच्या टोळक्याने बनविला होता. तो व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की, आठ दिवस तो घराच्या बाहेरही पडू शकला नाही. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. मात्र, या व्हिडिओच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेतला. त्याची चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.२० जून रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्याआधी १३ जून रोजी भटवाडी भागात ही घटना घडली. विकी भोसले या कुख्यात गुंडाची दहशत कायम राहण्यासाठी पूर्ववैमनस्यातून त्याच्या साथीदारांनी या तरुणाला बेदम मारहाण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विकीच्या विरोधात असलेल्या सागर रावलसोबत हा मारहाण झालेला तरुण असायचा. याच रागातून हा वचपा काढल्याचे बोलले जाते. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी २२ जून रोजी ताब्यात घेतले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.