शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाण्याचे पाणीसंकट गंभीर

By admin | Updated: March 23, 2017 01:34 IST

ठाणे जिल्ह्याच्या लोकसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता यापुढे फक्त उल्हास नदीवर अवलंबून न राहता शाई, काळू धरणे लवकर पूर्ण करावी लागतील.

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या लोकसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता यापुढे फक्त उल्हास नदीवर अवलंबून न राहता शाई, काळू धरणे लवकर पूर्ण करावी लागतील. तसेच उंची वाढवलेल्या बारवी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठवायला हवे, असा आग्रह जागतिक जलदिनी धरण्यात आला. ठाण्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका फक्त उल्हास नदीवर अलवंबून असल्याने आणि या नदीला प्रदूषणाचा फटका बसतानाच त्यातून पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने या नदीचे संरक्षण केले नाही, तर भविष्यात ठाण्यातील पाणीसंकट गंभीर होईल, अशी गंभीर चिंताही यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रत्येक महापालिकेची लोकसंख्या वाढत असल्याने त्यांची पाण्याची मागणी वाढत आहे. तसेच ठाण्यासारख्या महापालिका पाण्यावरील आपला जादा हक्क सोडत नसल्याचा मुद्दा पुढे आला. काही महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असूनही कारवाई सोडा; लोकसंख्येनुसार पाण्याचे समान वाटप होत नसल्याने पुढील काळात हा मुद्दाही गंभीर होईल, असे मत मांडण्यात आले. नियोजन भवनाच्या सभागृहात जलसंपदा विभागाने जलजागृती सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित केलेल्या चर्चासत्रात ही मते मांडण्यात आली. उल्हास नदीतून सध्या मिळणारे पाणी, त्याचे नियोजन, सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी आवश्यक पाण्याची तरतूद, नियोजनातील त्रुटी, उल्हास नदीतील प्रदूषण यावर एमआयडीसी, विविध महापालिका, नगरपालिकांचे अधिकारी, अशासकीय प्रतिनिधी आणि सदस्यांनी भाग घेतला.जीवन प्राधिकरणाचे निवृत्त सदस्य सचिव संजय दहासहस्त्र, अधीक्षक अभियंता बी.बी.लोहार, कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार, पत्रकार प्रसाद आळशी, प्रशांत मोरे यांनीही भूमिका मांडली. (प्रतिनिधी)कल्याण-डोंबिवलीसारख्या महापालिकांची आर्थिक क्षमता पाहता त्या धरणे बांधू शकत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारनेच धरणे उभारावी, अशी भूमिका कल्याण-डोंबिवलीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी मांडली. सध्या आरक्षणापेक्षा जास्त पाणी वापरले जाते. अधिक उपसा होतो. जलस्त्रोत मर्यादित आहेत. ते वाढविण्याची आर्थिक क्षमता महापालिकांकडे नाही. सध्याचा वाढीव उपसा पाहता येत्या २० वर्षात पाणीसाठा वाढविणारे जलस्त्रोत विकसित केले गेले नाहीत, तर पाण्याच्या उपशामुळे पाणीप्रश्न भयंकर स्वरुप धारण करेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाटबंधारे विभागाने प्रत्येक पालिकेला पाण्याचे प्रमाण वाढवून द्यायला हवे. तशी मागणीही होते. पण ती मंजूर होत नसल्याने जास्तीचे पाणी उपसले जाते. जर पाण्याचा कोटा वाढवून दिला आणि जादा पाण्यासाठी दर हजार लिटरला जादा दर लागू केला, तर जास्तीचे पाणी मिळू शकते. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी वाटप झाले पाहिजे. अनेक पालिका लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा वापर करतात. त्याचा फटका इतर पालिकांना बसतो आणि त्या त्या शहरांत भीषण पाणीटंचाई निर्माण होते. जी शहरे झपाट्याने वाढत आहेत, त्यांची पाण्याची गरज जास्त आहे. त्यांना जादा पाणी दिले जावे. समप्रमाणात पाणीवाटपाला राजकीय मंडळी राजी होतील की नाही, याबाबत शंका आहे. अन्यथा पुरेसे पाणी उपलब्ध असूनही पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जाईल, असे मतही त्यांनी मांडले. गावांत टँकर वाढवणारसध्या पाच टँकरद्वारे गावांना पाणी दिले जात असून पाणीटंचाई वाढल्याने टँकर वाढवले जातील, असे पाठक म्हणाले. तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्याचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी मान्य केले तरी अंमलबजावणी होत नसल्याचाआरोप प्रेमा म्हात्रे यांनी केला. २७ गावांमधील पाणीटंचाईवर पालिका प्रशासनाने जो कृती आराखडा तयार केला आहे, तो गुरूवारपर्यंत सादर करण्याचे आदेश म्हात्रे यांनी दिले. नऊ जोडण्यांचे काम पूर्णअनधिकृत बांधकामांना सर्रास पाणी दिले जात आहे, चोरीच्या नळजोडण्यांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष होते, याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले. त्यावर नळजोडण्या जुन्या होत्या, त्या नव्याने टाकण्याचे काम सुरू आहे. त्या अधिक व्यासाच्या टाकल्या जात असून वाढीव नळजोडण्या आणि स्थलांतर करण्याची कामे ३० ठिकाणी केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण पाठक यांनी दिले. ज्यावेळीस शटडाऊन असते त्यावेळेसच हे काम करता येते सध्या नऊ ठिकाणचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.