शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोन सुरक्षा रक्षकांवर दरोडेखोरांच्या टोळीचा तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

ठाणे : अवघ्या २० हजारांच्या ऐवजासाठी ठाण्यातील कोलशेत लोढा अमारा इमारतीच्या कंपाैंडमध्ये शिरलेल्या आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळक्याने ...

ठाणे : अवघ्या २० हजारांच्या ऐवजासाठी ठाण्यातील कोलशेत लोढा अमारा इमारतीच्या कंपाैंडमध्ये शिरलेल्या आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळक्याने दोन सुरक्षा रक्षकांवर तलवार आणि लोखंडी सळईने खुनीहल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील कोलशेत परिसरात लोढा अमारा इमारती कंपाैंड परिसरात २५ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास हे थरारनाट्य घडले. दरोडेखोरांच्या टोळक्याने इमारतीच्या कंपाैंडचा पत्रा तोडून इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळीने सुरक्षा रक्षकांवर तलवार आणि लोखंडी सळईने हल्ला केला. त्यात देवनाथ पांडे या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर आणि हातावर सळईने प्रहार करण्यात आला, तर एका दरोडेखोराने देवनाथ यांच्या तळहातावर तलवारीने वार करून त्यांना जबर जखमी केले. दुसरे सुरक्षा रक्षक विनयकुमार पांडे यांच्यावरही या टोळक्याने हल्ला केला. त्यांच्याही डोक्यावर त्यांनी सळईने वार केले. त्यानंतर या टोळीने इमारतीच्या आवारातून ॲल्युमिनियमच्या २० हजार रुपयांच्या शीट लुटून पळ काढला.

याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी सुरक्षा रक्षकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैभव मोसमकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.