शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

केंद्रासह राज्यापेक्षा ठाण्यात मृत्यूदर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:15 IST

विजय सिंघल यांचा दावा : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६ टक्क्यांवर

ठाणे : ठाण्यात विशेषकरून झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून ते बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ४६ टक्क्यांवर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र आणि राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचा दावा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी केला. ठाणेकरांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. याप्रसंगी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कोरोनाबाबतचे नियम शिथिल करीत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गरज असेल तरच बाहेर पडावे, ५० वर्षे वयोगटातील नागरिकांनी आणि १० वर्षांच्या आतील मुलांनी घरीच राहावे, असे आवाहनही केले. कामावर जाताना ताप आहे किंवा नाही, आॅक्सिजनचे प्रमाण किती आहे, हे तपासूनच घराबाहेर पडावे. खरेदी किंवा मॉर्निंगवॉकसाठी फिरताना तीन फुटांचे अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा. ठाणेकरांची साथ लाभली तर १५ दिवसांत कोरोना आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ठाण्यात ५० फिव्हर क्लिनिक सुरूशहरात ८८ अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध असून काही दिवसांत १०० हून अधिक उपलब्ध होतील. शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध असून झोपडपट्टी भागात ५० फिव्हर क्लिनिक सुरू करून एक हजार जणांची टीम ही घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम करीत आहे. आता ती कंटेनमेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहे.कोरोना रुग्णांसाठी आठ हजार बेडची सोयकोरोनाबाधितांसाठी ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू असून म्हाडाही हजार बेडचे रुग्णालय उभे करणार आहे. सद्य:स्थितीत शहरात आठ हजार बेड उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटपही सुरू आहे. ठाण्यात नियम शिथिल करीत असलो तरी खरबदारी म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी आलटूनपालटून दुकाने उघडी ठेवून झोपडपट्टी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

नालेसफाई योग्य पद्धतीनेयेत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने सुरू आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठीदेखील महापालिका सज्ज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या