शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

Thane: सरकारी जमिनीवर तब्बल ६० कच्ची बांधकामे करून भाड्याने देणाऱ्या भूमाफियावर अखेर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: July 24, 2024 22:30 IST

Thane News: मीरारोड येथील सरकारी जमिनीवर कब्जा करून त्यावर ६० वाणिज्य आणि निवासी वापरासाठी कच्ची बांधकामे भाड्याने दिल्या प्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

मीरारोड - मीरारोड येथील सरकारी जमिनीवर कब्जा करून त्यावर ६० वाणिज्य आणि निवासी वापरासाठी कच्ची बांधकामे भाड्याने दिल्या प्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

मीरारोडच्या कनकीया येथील गौरव सिटी कॉम्प्लेक्स , एव्हरशाईन वुड्स समोर मौजे नवघर सर्वे क्र ११४ हि सुमारे एक एकर १८ गुंठे सरकारी जमीन आहे .  सदर जमीन शासनाची असल्याचे माहित असून सुद्धा त्याठिकाणी शैलेश पाटील याने कब्जा करून त्यावर सुमारे ६० जणांना कच्ची वाणिज्य आणि निवासी बांधकामे करून देऊन त्याचे भाडे घेत असल्याची तक्रार अजय धोका यांनी केली होती . भूमाफिया पाटील वर एमपीडीए सह विविध कलमां खाली गुन्हा दाखल करून सर्व बांधकामे काढून टाकून भारणीचा दंड व वसूल भाड्याची रक्कम दंडासह वसूल करा असे धोका यांचे म्हणणे होते . सदर बेकायदा कच्च्या बांधकामांना पालिकेच्या प्रभाग अधिकारी यांनी सुद्धा संरक्षण दिल्याचा आरोप धोका यांनी केला होता . 

विशेष म्हणजे २०२२ सालीच तलाठी कार्यालयाने सदर सरकारी जागेवर अतिक्रमण केले गेल्याचा  अहवाल वरिष्ठांना सादर केला होता . धोका यांनी पाठपुरावा केल्या नंतर तलाठी नितीन पिंगळे यांनी पुन्हा सविस्तर अहवाल सादर केला होता . अखेर वरिष्ठांनी लेखी पत्र दिल्या नंतर मंगळवार २३ जुलै रोजी पिंगळे यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत .  

टॅग्स :mira roadमीरा रोड