शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात पावसाचे ३० बळी

By admin | Updated: September 12, 2016 03:11 IST

जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सरासरी २२६२.७१ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी तो केवळ १५४४.७९ मिमी होता

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सरासरी २२६२.७१ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी तो केवळ १५४४.७९ मिमी होता. यंदा संततधार सुरू असलेल्या पावसादरम्यान विविध कारणांनी सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला असून ८९ जणांचा जीव वाचवण्यात यश मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाद्वारे केला जात आहे. सुमारे सरासरी ७१७.९२ मिमी जादा पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२.३५ टक्के पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहरात (११४.५९ टक्के) पडला आहे. जिल्ह्यातील ४० गावांना या पावसाचा जोरदार फटका बसला असून त्यांची झळ ३३४ ग्रामस्थांना बसली. यादरम्यान दगावलेल्या ३० जणांपैकी कल्याण तालुक्यातील तीन, अंबरनाथमधील सहा, एक शहापूर, भिवंडी इमारत दुर्घटनेसह या तालुक्यातील १९ आणि ठाणे शहरातील एकाचा या पावसाळ्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे. या पावसाळ्यात ३३ व्यक्ती जखमी झाल्या असून चार जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसाच्या कालावधीत १३ घरे पडली असून ९७ घरे बाधित झाली आहेत. तीन मोठमोठ्या बांधकामांना या पावसाची झळ बसली आहे.