शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व चौक्या सुधारणार

By admin | Updated: December 24, 2015 01:44 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या चौक्या तातडीने दुरूस्त करण्याचे, त्यांत आमूलाग्र सुधारणा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले आहेत.

जितेंद्र कालेकर,  ठाणे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या चौक्या तातडीने दुरूस्त करण्याचे, त्यांत आमूलाग्र सुधारणा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले आहेत. या चौक्यांमध्ये तक्रार घेण्यासाठी २४ तास अधिकारी आणि कर्मचारीही नियुक्त करण्यात येणार आहेत.यासाठी रोटरी, लायन्ससारख्या वेगवेगळ््या सामाजिक-स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये २२ डिसेंबरच्या अंकात ठाणे पूर्व येथील आनंद टॉकीज-सिंधी कॉलनी, बी केबीन, कल्याणचे पौर्णिमा टॉकीज-बाजारपेठ पोलीस ठाणे, वल्लीपीर नाका, अंबरनाथचा शिवाजी चौक अशा विविध ठिकाणच्या पोलीस चौक्यांच्या दूरवस्थेची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यांना कशी अवकळा आली आहे, त्याचे चित्र मांडले होते. त्यांच्या दुरूस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने कायद्यासोबत सुव्यवस्था राखणाऱ्यांची कशी परवड होते आहे, याचा आँखो देखा हाल मांडण्यात आला होता. त्याची तातडीने दखल घेत मंगळवारच्या बैेठकीत आयुक्तांनी सर्व चौक्यांचा आढावा घेण्याचे आदेश ठाणे शहर, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळातील उपायुक्तांना दिले.काय आहेत आदेश सर्व पोलीस चौक्यांचा आढावा घेऊन त्यांचे बाहय आणि अंतरंग चांगले करावे. त्यासाठी सामाजिक संस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचीही मदत घ्यावी. चौक्यांचे बांधकाम मजबूत करावे. फर्निचरची व्यवस्था करुन रंगरंगोटी तसेच साफसफाई करुन चौकी सुव्यवस्थेत ठेवावी. चौकीत तक्रार घेण्यासाठी २४ तास कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.