शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आठ महिन्यांत पडली ५८५ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात मागील आठ महिन्यांत ५८५ झाडे उन्मळून पडली. यातील काही घटनांमध्ये दोघांना नाहक आपला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरात मागील आठ महिन्यांत ५८५ झाडे उन्मळून पडली. यातील काही घटनांमध्ये दोघांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे तर, १३ जण बचावले असून, काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. ज्या झाडांच्या केवळ फांद्या पडल्या होत्या त्यांचीही स्थिती धोकादायक झाली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील झाडाजवळून जाताना खबरदारी घ्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाते. त्याचवेळी दुसरीकडे रस्त्यालगतची शेकडो झाडे ही पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यांमुळे उन्मळून पडतात. पावसाळ्याप्रमाणे इतर ऋतूंमध्येही झाडांची हीच अवस्था होते. त्यामुळे जानेवारी ते ३ सप्टेंबर २०२१ या आठ महिन्यांत ५८५ लहान-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. यामध्ये २९० झाडांच्या फांद्या पडल्या असून, २२५ झाडांची स्थिती धोकादायक झाली आहे. अनेकदा ही झाडे घरांवर तसेच रस्त्यावर उभ्या किंवा धावणाऱ्या वाहनांवर पडली आहेत. त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पादचाऱ्यांच्याही अंगावर पडल्याने ते जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मागील आठ महिन्यांत वागळे इस्टेट, वर्तकनगर, माजीवडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि नौपाडा-कोपरी या प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी दोन घटना घडल्या आहेत.

- नौपाड्यात दोघांचा बळी

नौपाडा - कोपरीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाला असून, इतर चार प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी दोघे जण जखमी झाले आहेत.

- उन्हाळ्यातही पाच घटनांची नोंद

पावसाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही सर्वाधिक झाडे उन्मळून पडली. यातील पाच घटनांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला आहे, तर चौघे जण जखमी झाले.

पावसाळ्यातील सात घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत.

* पडलेल्या झाडांचा तपशील

महिना - झाड पडल्याची घटना - फांदी पडली

जानेवारी- ०५ - १२

फेब्रुवारी- १२ - १५

मार्च- १३ - ८

एप्रिल- २० - १४

मे- २८५ - ९४

जून- १०१ - ५८

जुलै- ११८ - ६३

ऑगस्ट- २७ - २५

३ सप्टेंबरपर्यंत- ४ - १

एकूण- ५८५ - २९०

-----------