शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी संघाचा जि.प.समोर थाळीनाद

By admin | Updated: December 24, 2015 01:30 IST

सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याने शासकीय सेवेत असूनही अंगणवाडी आशा स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना या शिफारशींचा फायदा मिळणार नसल्याने

पालघर : सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याने शासकीय सेवेत असूनही अंगणवाडी आशा स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना या शिफारशींचा फायदा मिळणार नसल्याने ‘‘सबका साथ सबका विकास’’ ही मोदी सरकारची घोषणा फक्त काही मूठभर कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी तर इतर कर्मचाऱ्यांचे जीवन भकास करणार असल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या हजारो कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात पालघर जिल्हापरिषदेवर थाळीनाद मोर्चा बुधवारी नेला होता, त्यावेळी हा आरोप करण्यात आला होता.भारत सरकारने नेमलेल्या सातव्यावेतन आयोगाने शिफारशी सादर केल्यानंतर केंद्रसरकारच्या ४७ लाख कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ होणार आहे. तर केंद्र सरकारच्या ४२ लाख पेन्शनर्सच्या पेन्शनमध्ये २४ टक्के वाढ करताना अत्युच्च अधिकाऱ्यांचे पगार ९० हजारावरून थेट २.५० लाखापर्यंत वाढविण्यात आले आहेत. या शिफारशी जाहीर केल्यानंतर राज्यशासनाचा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवामधील चतुर्थ श्रेणीमधील सुमारे १.७५ लाख पदे टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रयत्न शासन करणार असल्याचे मोर्चेकरांचे म्हणणे आहे. या नोकर कपातीमुळे काही खातील तुपाशी व बहुसंख्य राहतील उपाशी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. हा वेतन आयोगाचा बोजा भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप करण्यात आला.सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांनाच मिळणार असल्याने शासकीय सेवेत असूनसुद्धा लाखो कर्मचारी व आशा स्वयंसेविका, कंत्राटी, आरोग्यसेविका, सफाई कामगार यांना त्यांचा काहीही फायदा मिळणार नाही.संघटीत कामगार क्षेत्रातील सेवाशर्ती ठरविताना असंघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने समन्यायी व सर्वसमावेशक विचार केला पाहिजे असे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे. तसेच कंत्राटी व मानधनी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांना वेतन आयोगाचा लाभ द्या, अनुसूचित क्षेत्रातील गरोदर मातांना एकवेळच्या सकस आहार देण्यासाठी अमृत आहार योजनेसाठी शासनाने प्रती दिन फक्त २५ रू. खर्चाची तरतूद केली असल्याने ती दुप्पट करावी. अंगणवाडी सेविका व मदतनिसाना गरोदर माता व स्तनदा माताना शिजवून देण्यासाठी मिळणारा २५० रू. चा मोबदला वाढवून १ हजार करण्यात यावा. इ. मागणीसाठी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा एम. ए. पाटील, उपाध्यक्ष मंगला सराफ, सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता.