शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ठामपाच्या शाळा होणार हायकेट

By admin | Updated: August 20, 2016 04:48 IST

लोकमतने प्रदीर्घ मालिकेद्वारे ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर सुरूवातीला त्यांच्या दुरूस्ती आणि डागडुजीसह नव्या शाळा बांधण्यासाठी

ठाणे : लोकमतने प्रदीर्घ मालिकेद्वारे ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर सुरूवातीला त्यांच्या दुरूस्ती आणि डागडुजीसह नव्या शाळा बांधण्यासाठी ३९ कोटींची तरतूद करणाऱ्या प्रशासनाने आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नवीन कृतीयुक्त अध्ययन प्रणाली, सेमी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब, १० शाळांमध्ये संगणक लॅब, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सिग्नल, शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा, दोन रात्रशाळा हे महत्त्वाचे प्रकल्पचे सुरू केले आहेत. शुक्रवारी महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, सभागृह नेते अ‍ॅड. अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते त्यांची अंमजबजावणी करण्यात आली.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये शाळा हायटेक आणि आधुनिक सोयीसुविधा देण्याबाबतची घोषणा आयुक्तांनी केली होती. या सर्व पाच प्रकल्पांची सुरूवात शुक्रवारी झाली. यातील पहिल्या प्रकल्प कोलशेतच्या शाळा क्र मांक ५२ मधील इंग्रजी माध्यमात सुरू केला. या शाळेमध्ये पॅडॉलॉजीवर आधारीत कृतीयुक्त अध्ययन पद्धतीच्या प्रशिक्षण प्रणालीचे उद्घाटन झाले. टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि परिसर आशा या स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी १ ली ते ५ वीच्या एकूण ५ शाळा घेतल्या असून या शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्यही परिसर आशा या संस्थेने दिले आहे.तर मानपाडा येथील शाळा क्र मांक ६४ येथे स्मार्ट सेमी इंग्रजी शाळेचे उद्घाटन करण्यात आले. येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पहिलीच्या वर्गातील मुलांना शिकविण्यात येणार आहे. समूह अध्ययन पद्धतीचा अवलंब करून टॅबच्या माध्यमातून १० गट शाळेतील १५० विद्यार्थ्यांना येथे शिकविण्यात येणार आहे. यासाठी सेव्ह दी चाईल्ड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेमी इंग्रजी शाळेतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे.केप जेमिनी तसेच आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थांतर्फे ठाणे महानगरपालिकेच्या २८ शाळांमध्ये संगणक लॅब आणि ई क्लास प्रणाली सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्र माची सुरूवात खारीगाव येथील मनपाच्या शाळेतून झाली. यानंतर पारिसकनगर येथील शाळा क्र मांक ६८ येथे रात्र शाळेचे उद्घाटन करण्यात आले. कळवा आणि मनोरमानगर येथे ही रात्रशाळा सुरू केली आहे.सर्वात उपयुक्त उपक्र म म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली सिग्नल शाळा. पोटा-पाण्यासाठी सतत भटकंती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्र म अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे रोजगारासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी या विद्यार्थ्यांच्या पालकांना महापालिकेच्यावतीने व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना येथे रोजगाराची साधने उपलब्ध होतील. या सिग्नल शाळेच्या ठिकाणी खेळण्यासाठी मैदान, खेळण्यासाठी उपकरणे, संगणकांची व्यवस्था, खेळणी आणि ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.