शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एक तासात ३० मि.मी. पावसाची नोंद

By admin | Updated: September 14, 2016 04:24 IST

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारी एक तासभर ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले. अचानक जोरदार सरी कोसळल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारी एक तासभर ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले. अचानक जोरदार सरी कोसळल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. सप्टेंबर महिन्यात पावसाचा लपंडावाचा खेळ सुरू आहे. कधी अचानक कोसळणे तर कधी मोठी विश्रांती घेणे असा पावसाचा खेळ ठाणेकर अनुभवत आहेत. मंगळवारी मात्र ठाणेकरांना दुपारच्या सुमारास पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळाले. सकाळी शहरात ऊन पडले होते. पावसाची कोठेही चिन्ह दिसत नव्हती. दुपारी १२ वाजल्यापासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली दुपारी १२.३०च्या सुमारास पावसाने जोर धरला दुपारी दीड वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरु होता. पावसाचा जोर पाहून दिवसभर हा पाऊस थांबणार नाही असाच काहीसा समज झाला होता. परंतु दुपारी दीड नंतर पावसाने विश्रांती घेतली व त्यानंतर पुन्हा लख्ख पडलेल्या उन्हामुळे उकाडा वाढला. या एक तासात ३० मि.मी. पावसाची नोंद झाली. गणपतीचे शेवटचे दोन दिवस राहिल्याने दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा मात्र या पावसामुळे गोंधळ उडाला आणि सर्वत्र धावधाव झाली.