शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीच्या कमानी तोडल्याने तणाव

By admin | Updated: October 13, 2016 03:56 IST

मोहरमनिमित्त काढलेल्या ताजियाच्या मिरवणुकीवेळी अडसर ठरत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या कमानी तोडण्यात आल्याने भिवंडीच्या गायत्रीनगरमध्ये

भिवंडी : मोहरमनिमित्त काढलेल्या ताजियाच्या मिरवणुकीवेळी अडसर ठरत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या कमानी तोडण्यात आल्याने भिवंडीच्या गायत्रीनगरमध्ये संध्याकाळी तणाव निर्माण झाला. त्यातून दोन्ही गटांत दगडफेक झाल्याने जमावाची पळापळ सुरू झाली. त्यात काही जण जखमी झाले. जमावाने एक मोटारसायकलही जाळली. वातावरण तणावपूर्ण बनल्याने परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.संवेदनशील शहर असल्याने सर्व सणांच्या काळात तेथे कडक पोलीस बंदोबस्त असतो. आतापर्यंतचे सर्व सण शांततेत पार पडले. नवरात्रीनिमित्त आगमन झालेल्या देवीच्या मूर्तींचे मंगळवारी विसर्जन झाले. पण, ठिकठिकाणी रस्त्यांत स्थानिक मंडळे, नगरसेवक, राजकीय पक्षांतर्फे स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्या अद्याप काढलेल्या नव्हत्या. आजादनगर, न्यू आजादनगर, नुरीनगर येथे बुधवारी मोहरमनिमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी निघालेली ही मिरवणूक गायत्रीनगर, नागावमार्गे जात असताना रस्त्यातील स्वागत कमानींना अडली. ताजियाला कमानी अडसर ठरत असल्याने संतप्त जमावाने त्या तोडल्या. कमानींच्या बॅनरवर दुर्गादेवीचे फोटो असल्याने देवीचा अपमान झाल्याच्या भावनेने या घटनेचा विरोध करीत स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. त्यातून दोन गटांत तणाव, वाद आणि नंतर दगडफेक झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पळापळ सुरू झाली. त्यामध्ये नागरिक विशेषत: लहान मुले रस्त्यावर पडली. त्यांना मार लागला. ताजिया मिरवणुकीवेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. सध्या गायत्रीनगरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रमसिंग पाटणकर, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांची मंदिरात सभा घेऊन समजूत काढली.