शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर महापालिकेत टेंडर घोटाळा!

By admin | Updated: July 11, 2016 02:02 IST

आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कंत्राटे मिळावी, यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई करणे, फेरनिविदा मागवणे, निविदा मागे घेणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

मीरा रोड : आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कंत्राटे मिळावी, यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई करणे, फेरनिविदा मागवणे, निविदा मागे घेणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेत सुरू असलेला टेंडर घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. तर, या घोटाळ्यामुळे शहरातील विकासकामे मात्र रखडली असून दुसरीकडे सत्ताधारी यांच्यातील निविदा मिळवण्यावरून सुरू असलेली अंतर्गत साठमारी चर्चेचा विषय ठरली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपा, शिवसेना व बविआ युतीची सत्ता असून भाजपाच्या गीता जैन महापौर, तर सेनेचे प्रवीण पाटील उपमहापौर आहेत. पण, पालिकेसह स्वपक्षात भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याखालोखाल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे वर्चस्व आहे. पालिकेच्या विविध कामांची कंत्राटे घेण्यावरून सध्या जोरदार लॉबिंग सुरू असल्याचा कळीचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच, कंत्राट आपापल्या मर्जीतील वा अर्थपूर्ण कारणांशी संबंधित कंत्राटदारांना मिळावे, यासाठी काही महिन्यांपासून साठमारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर निविदा सूचना क्रमांक २८३ प्रसिद्ध केली होती. कोट्यवधींची तब्बल ४१ कामे काढली होती. त्यापैकी ११ कामांसाठी कोणतेही सबळ कारण नसताना स्थायी समितीने फेरनिविदा मागवण्याचा ठराव केला. विशिष्ट कंपन्यांनी केलेली स्पर्धा व त्यांना कामे न मिळता आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावी, यासाठी फेरनिविदा मागवण्याचा घाट घातला जात आहे. १७ मार्च ही निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत, तर दुसऱ्या दिवशी निविदा उघडण्याची तारीख होती. गटारे बांधून स्लॅब टाकण्यासाठी असलेली ही कामे ३० लाखांपासून १ कोटी किमतीची होती. जवळपास सर्वच कामांची मुदत चार महिन्यांची होती. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने निव्वळ स्पर्धा होऊ न देता मर्जीतल्या कंत्राटदारांनाच कामे मिळावी, यासाठी गेल्या वर्षापासून ही सर्व कामे रखडवली. असाच प्रकार पालिकेने मार्च २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या निविदा सूचना क्रमांक ४५२ च्या बाबतीत घडला. या सूचनेद्वारे पालिकेने तब्बल ३५ कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. यातील कामे १० लाखांपासून ४ कोटी ३८ लाखांपर्यंतच्या किमतीची होती. शहरातील विविध विकासकामांचा समावेश असलेल्या या निविदा सूचनेत कामांची मुदत दोन महिन्यांपासून वर्षभराची होती. कोट्यवधींच्या कामांच्या निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१६ ही होती. १ एप्रिल रोजी निविदा उघडायची होती. परंतु, प्रशासनानेही निविदा उघडणे, छाननी करणे व त्यास निविदा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यासाठी कमालीची दिरंगाई केली. पावसाळा तोंडावर असल्याने मार्च,एप्रिलमध्येच निविदा मंजूर करून पालिकेने कार्यादेश देणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी पालिकेने तब्बल जूनअखेरपर्यंत वेळकाढूपणा केला, जेणेकरून अनेक विकासकामे होणार होती, तीदेखील बारगळली. दरम्यान, फेरनिविदा सूचना क्रमांक ४६२ व ४५२ मध्ये ज्या कामांसाठी आपल्या मर्जीतले कंत्राटदार बसतात, त्यांची निविदा मंजुरीसाठी समितीमध्ये घेण्यात पालिकेतील वजनदार नेतृत्व यशस्वी झाले. (प्रतिनिधी)