शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संगीत साधनेसाठी दहा वर्षांची शिष्यवृत्ती हवी

By admin | Updated: January 11, 2016 01:52 IST

संगीताच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे दोन वर्षाची स्कॉलरशिप दिली जाते. गरीब मुलांना त्याचे अप्रूप वाटते. संगीताच्या शिक्षणासाठी दोन वर्षाचा कालावधी अपुरा असतो.

ठाणे : संगीताच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे दोन वर्षाची स्कॉलरशिप दिली जाते. गरीब मुलांना त्याचे अप्रूप वाटते. संगीताच्या शिक्षणासाठी दोन वर्षाचा कालावधी अपुरा असतो. त्यासाठी दहा वर्षाची शिष्यवृत्ती असली पाहिजे. स्कॉलरशिप मध्ये मुलांना राग शिकवले जात नाही. अपू-या शिक्षणाने मुलांचे नुकसान होत असते. भारतात असलेली पाश्चिमात्य पद्धत जो पर्यंत जात नाही तो पर्यंत भारतातील कोणताही विषय पुढे जाऊ शकणार नाही असे परखड मत गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी ठाण्यात व्यक्त केले. विश्वशांती संगीत समितीतर्फे शनिवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती संगीत नृत्य महोत्सवाच्या कार्यक्र मात किशोरीताईंशी संगीतशास्त्राचे अभ्यासक प्रा. केशव परांजपे व त्यांच्या शिष्या नंदिनी बेडेकर यांनी मुक्तसंवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संगीत हे वैश्विक आहे. तपश्चर्या, जपापासून आपण कित्येक विषय अनुभवतो. परंतू कानाला गोड वाटतो तो सूर. सूर हा शरीराला आनंद देणारा आहे. नृत्यातून शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली होत असतात. त्यात धांगडधिंगा नसतो. त्यातून नृत्य करणा-याला शांती मिळत असते. नृत्य-सुरातून जो आनंद सादर करणा-याला मिळत असतो तो प्रेक्षकांनाही मिळत असतो. लोक वाईट असतात असे आपण म्हणत असतो तेव्हा आपण काहीतरी चुकत असतो. लोक अपेक्षेने येतात. त्यांच्या अपेक्षांची पूर्ती झाली पाहिजे. सुरांची भाषा झाडे-फुले, कीटक, जमीन यांनाही समजत असते. सूर शब्दांना गाते करतो. सूर एकमेकांच्या हातातहात घालून येत असतात. संगीत कलेमध्ये ज्ञानसंपादन करावे. ज्ञानाचा आनंद मिळत असतो. संगीतातील राग गाता आला पाहिजे. रागाचा विचार आयुष्याशी, जीवनाशी जुळतो. राग आई सारखा दयाळू आहे. आई मुलाला जशी संभाळते तसा राग सांभाळत असतो. रागाची साधना केली पाहिजे. जो पर्यंत आपले समाधान होत नाही, तो पर्यंत साधना केली पाहिजे. चांगल्या गाण्यासाठी श्रोते आहेत. ते खरे असले पाहिजे, फक्त श्रवण करणारे नको. चांगले गाणे असेल तर चार श्रोते बसू शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले.या विषयाचा अभ्यास करणा-यांनी महिनाभर सा म्हटला पाहिजे. त्यानंतर सूर येतील. सूर आले कि माध्यमावर प्रभुत्व येईल. त्यातून माध्यमाच्या पलीकडे असलेली शांती मिळेल असेही त्यांनी सांगितले.कार्यक्र माच्या पुर्वार्धात पं.सुरेश बापट, कल्याणी साळुंखे, किशोर पांडे, संस्थेच्या प्रमुख मुक्ता जोशी आणि त्यांच्या विद्यार्थिनींचे कार्यक्र म झाले.