शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

दी एज्युकेशनच्या निवडणुकीत संघाचा झेंडा

By admin | Updated: March 1, 2016 02:26 IST

अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती.

अंबरनाथ : अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत अजित म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघाच्या पॅनलला आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे ही निवडणूक संघासाठी प्रतिष्ठेची झाली होती. अखेर, संघाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत ६०२ मतदारांपैकी अवघ्या २३१ मतदारांनी सहभाग घेतला.दी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना १९३६ साली भाऊसाहेब परांजपे यांनी केली. संस्थेच्या कानसई माध्यमिक शाळा, पी.डी. कारखानीस महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व ज्यु. कॉलेज, बाल भवन प्राथमिक शाळा, सुशीलाताई दामले विद्यालय, शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, गुरुकुल विद्यालय, डालारे येथे आदिवासी शाळा, आंदाड येथे आदिवासी माध्यमिक विद्यालय याच सोसायटीच्या अंतर्गत आहे. अध्यक्षपदासाठी संघाच्या वतीने डॉ. श्रीकृष्ण पाडगावकर यांचा अर्ज आला, तर संस्थेच्या गैरकारभाराच्या विरोधात भूमिका घेणारे अजित म्हात्रे यांनीदेखील या पदासाठी अर्ज दाखल केला. मात्र, संघाने चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांनी आपला अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतल्यावर पाडगावकर हे अध्यक्षपदी बिनविरोध आले. मात्र, म्हात्रे यांच्या इतर सदस्यांना कार्यकारिणीत आणि विश्वस्त म्हणून घेण्याचा शब्द न पाळल्याने विश्वस्तपदासाठीचा आपला अर्ज म्हात्रे यांनी कायम ठेवला. त्यांच्यासोबत या पदासाठी मनोज वैद्य आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी मोहनलाल कुमावत यांचे अर्ज दाखल केले. मात्र, विश्वस्तपदावर अजित म्हात्रे आणि मनोज वैद्य या दोघांचा पराभव झाला. या पदावर भगवान चक्रदेव, केशव देशपांडे, नरेंद्र कुलकर्णी, वर्षा प्रभुदेसाई, त्र्यंबक राजगुरू यांची निवड झाली. सदस्यपदासाठी संतोष भणगे, डॉ. अजित गोडबोले, बाळकृष्ण कांबळे, उमा लिमये, डॉ. अजित पटवर्धन, सतीश पालकर, दिलीप साठे हे निवडून आले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने संघासाठी आव्हानात्मक होती. निकाल लागला असला तरी सदोष मतदार यादीबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.