शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गळक्या वर्गात सुरू आहे शिक्षण

By admin | Updated: July 14, 2016 01:42 IST

शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली

भिवंडी : शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली. अशा गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील गळक्या वर्ग खोल्या, परिसरातील अस्वच्छता, नादुरु स्त स्वच्छतागृह, उघड्यावरील वीज वाहिन्या यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणाचा उबग आल्याने शेवटी सोमवारी तेलगू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह भिवंडी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिका अधिकाऱ्यांनी सात दिवसात दुरु स्तीचे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले. २०१४ मध्ये प्रभाग समिती कार्यालयाची इमारत झाल्यानंतर येथील इमारतीत महापालिकेच्यावतीने माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रात तर दुपारच्या सत्रात मराठी प्राथमिक शाळेचे वर्ग भरविले जातात. या शाळेच्या वर्ग खोल्यांवरील पत्रे तुटलेले असल्याने पावसाळ््यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असून अशा वर्गात बसणे विद्यार्थ्यांच्या नशिबी आले आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेली असल्याने पावसाची झड खिडक्यांमधून येते. याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वर्गातील वायर लटकत आहेत. पंखा, ट्यूूब सुरु करण्यासाठी गेले असता विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागला आहे. त्यासोबतच येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारांमुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबत महापालिका मुख्यालयात आयुक्तांचा दरवाजा ठोठावला. आयुक्त कार्यालयात नसल्याने विद्यार्थी व पालकांनी कार्यालया बाहेर सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. आयुक्त आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करुन सात दिवसात शाळा इमारतीची दुरु स्ती करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. या शाळेच्या परिसरात अस्वच्छता असून शाळेच्या मागील बाजूस उकिरडा झाला आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. नगरसेवक मुरली मच्छा यांच्याकडे तक्र ार करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. जो पर्यंत शाळेतील वर्गखोल्या दुरु स्त होत नाहीत तो पर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालक सांगतात.