शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन मूळ बँकेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:24 IST

शिक्षकांचे वेतन सणासुदीसाठी मूळ बँकेत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

सुरेश लोखंडे ।ठाणे : शिक्षकांचे वेतन सणासुदीसाठी मूळ बँकेत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेत ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शिक्षकांचे वेतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सवासारखा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन शिक्षकांचे वेतन २३ आॅगस्टला म्हणजे एक आठवडा आधीच करणार असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.टीडीसीसी बँकेऐवजी शिक्षकांचे वेतन टीजेएसबी बँकेत वळवण्याच्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी सोमवारी झाली. सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन रखडणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना न्यायालयाने देऊन या काळात मूळ बँकेतच शिक्षकांचे वेतन त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे २० हजार ४९६ शिक्षकांचे वेतन २३ आॅगस्टला करण्याच्या निर्णयास बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुºहाडेंसह बँकेच्या सर्व संचालकांनी एकमताने घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.उच्च न्यायालयात या याचिकेवरील शेवटची सुनावणी सप्टेंबरअखेर होणार असून तो निर्णयही टीडीसीसीच्या बाजूने लागेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मात्र, सध्या तरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक एक हजार २१८ शाळांमधील २० हजार ४९६ शिक्षक टीडीसीसी बँकेचे खातेदार आहेत.त्यांना गणेशोत्सवासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचे वेतन आधीच देण्याचा निर्णय घेऊन टीडीसीसीने टीजेएसबीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आॅगस्ट महिन्यापासून शिक्षकांचे पूर्ण वेतन टीजेएसबीतून होणार होते. परंतु, सणासुदीच्या कालावधीत शिक्षकांचे वेतन मूळ बँकेतून करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने टीजेएसबीतून होणारे वेतन सध्या तरी रखडले आहे.आजमितीस टीडीसीसी बँकेत जिल्ह्यातील ४३२ प्राथमिक, तर ४८६ माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक १२१८ शाळांमधील शिक्षकांच्या ९९६ कोटी ५६ लाखांच्या ठेवी आहेत. त्यांना टीडीसीसीने ५३१ कोटी ६३ लाखांचे कर्जवाटप केले आहे. यामध्ये २५ कोटी १२ लाखांचे गृहकर्ज, आठ कोटी ९६ लाखांचे शैक्षणिक व अन्यही स्वरूपांचे कर्ज दिले आहे.>पुढील सुनावणीकडे लागले लक्षआर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या टीडीसीसी बँकेचे नोटाबंदीच्या काळातही वर्किंग कॅपिटल सात हजार ३१३ कोटींचे होते. बँकेत सहा हजार १८ कोटींच्या ठेवी असून अन्य ठेवीदेखील २७ कोटी ९६ लाखांच्या आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या बँकेने शिक्षकांचे शासनाकडून वेतन येण्याआधीच ७५ कोटींचे वेतन देण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांना सुखद धक्का दिला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये होणाºया न्यायालयीन सुनावणीत काय आदेश होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.