शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कर थकवणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही

By admin | Updated: March 30, 2017 04:17 IST

कराची वसुली करण्यासाठी पालिकेने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकण्याचा प्रयोग केला होता

अजित मांडके / ठाणेकराची वसुली करण्यासाठी पालिकेने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकण्याचा प्रयोग केला होता. परंतु, या प्रयोगानंतरही पालिकेला ‘कचरा कर’ वसुलीच्या नियोजित लक्ष्याच्या अर्धा टक्का लक्ष्यदेखील गाठता आलेले नाही. २० कोटींचे लक्ष्य असताना या विभागाला आतापर्यंत केवळ ७५ लाखांचीच वसुली करता आलेली आहे. त्यामुळे आता केवळ मार्चअखेरपर्यंतच ही मोहीम सुरू न ठेवता नव्या आर्थिक वर्षातही ती सुरू ठेवण्यात येणार असून, कचरा कराची थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांचा कचराच न उचलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोबतच वेळ पडल्यास दुकानेही सील केली जाणार आहेत.ठाणे महापालिकेच्या विविध करांमध्ये यंदा प्रथमच कचरा कराचाही समावेश झाला आहे. त्यानुसार, मागील वर्षापासून त्याची वसुली सुरू झाली आहे. परंतु, त्याची वसुलीच न झाल्याने पालिकेने थकबाकीदार व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर कचरा टाकण्याचा प्रताप केला होता. असे केल्याने व्यापारी कचरा कर भरतील, असा कयास प्रशासनाने लावला होता. परंतु, त्यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटली. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोरील कचरा उचलून तो प्रभाग समिती कार्यालयासमोर टाकला. त्यानंतर, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांची पाठराखण केली. असे कृत्य करणाऱ्या पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, एवढे होऊनही प्रशासनाला या कराची वसुली करण्यात अपयश आले आहे. घनकचरा विभागाला या कराची वसुली करण्यासाठी २० कोटींचे टार्गेट दिले होते. परंतु, २९ मार्चपर्यंत केवळ ७५ लाखांचीच वसुली झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता याविरोधात कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. त्यानुसार नव्या आर्थिक वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांची थकबाकी असेल, त्यांच्या दुकानातील कचराच न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रभागनिहाय पथकेकराच्या वसुलीसाठी प्रभागनिहाय आणि हजेरी शेडनिहाय पथक गठीत करून वसुली केली जाणार आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात जी भूमिका घेतली जाते, ती आता कचरा कराची थकबाकी ठेवणाऱ्यांबाबत घेतली जाणार असून, त्यांची मालमत्ता सील करण्यात येणार आहे.