शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

तालुकानिर्मिती ही अडचण नसून खोळंबा-सांबरे

By admin | Updated: May 8, 2017 05:47 IST

जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन सन-१९९९ रोजी विक्रमगड या स्वतंत्र तालुक्याची निर्मीती होऊन आज १७ वर्र्षाचा प्रदिर्घ काळ लोटला

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन सन-१९९९ रोजी विक्रमगड या स्वतंत्र तालुक्याची निर्मीती होऊन आज १७ वर्र्षाचा प्रदिर्घ काळ लोटला आहे़ तरी या तालुक्याचा अपेक्षित विकास झाला नाही. अजूनपर्यत अनेक शासकीय कार्यालये अस्तित्वात आलेली नाहीत व जी कार्यालये सुरु करण्यात आली आहेत़ त्यामधील ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीपदे रिक्त आहेत़ तर एकही समक्ष अधिकारी येथे नसून सर्वच कार्यालयातील प्रमुखपद प्रभारी आहेत़ त्यामुळे ही तालुका निर्मिती असून अडचण नसून खोळंबा अशी ठरली आहे. अशी टीका सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली आहे. या तालुक्यात पाण्याची, रोजगाराची मोठी समस्या असूनही येथील आमदार, खासदार हे ती सोडवू शकले नाहीत. आज तर आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री अशी दोन्ही पदे असतांना तसेच हा मतदार संघ विष्णू सवरा यांचाच बालेकिल्ला म्हणून संबोधला जात असतांना नुसती रस्त्यांना मंजूरी देऊन व त्यासाठी कोटयावधीचा निधी देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्याने मूलभूत प्रश्न कसे सुटणार? आज या तालुक्यात रोजगार नसल्याने तरुणांना शिक्षण घेऊनही भटकंती करावी लागत आहेत़ अपुरे कर्मचारी असल्याने गरीबांना महिनोन्महिने छोट्याछोट्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. पाणी टंचाईग्रस्त जनतेचा दिवस रणरणत्या उन्हात हंडाभर पाणी आणण्यात जातो आहे. हे चित्र बदलणार कधी असा सवाल त्यांनी केला. आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या या भागात शेती, रोजगार, शिक्षण, पाणी, आरोग्य, मूलभूत गरजांसाठी या भागातील जनतेला प्रामुख्याने खेडया-पाडया-वस्त्यांतील आदिवासी जनतेला आजही वणवण भटकंती करावी लागत आहे. मुंबई-ठाणे या बडया शहरांलगतच या शहराची जवळीक असल्याने येथील गावे आता शहर म्हणून ओळखली जाउ लागली आहेत या तालुक्यात ९५ गावांचा व १लाख २५ हजार लोकसंख्येचा समावेश करण्यांत आला आहे़ मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीच्या उत्पन्नातही निसर्गाच्या नेहमीच्या लहरीपणामुळे फारच घट होऊ लागली आहे़ शेती आहे तर पाणी नाही, जमीन धनदांडग्यांनी खरेदी करण्याचा सपाटाच लावल्यामुळे शेतकरी भूमीहीन होत आहेत़ विकासासाठी कोटयावधी रुपये शासनाकडून खर्ची करुनही नियोजनाअभावी आदिवसींची प्रगती होऊ शकलेली नाही, प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी एकाही राजकीय पक्षाकडे इच्छाशक्ती नसल्यामुळे कुपोषण, बालमृत्यू ,बेकारी, रोजगारीचा अभाव, शिक्षण, पाणी अशा समस्यांना येथील जनतेला सामोरे जावे लागत आहे ़यातील एक महत्वाचा भाग म्हणजे कवडास व धामणी अशा धरणांचा फायदा तालुक्याला झालाच नाही़ या धरणासाठी ज्या आदिवासींच्या जमीनी गेल्या संपादित केल्या आहेत ़त्यांना अल्प मोबदला तर काहींना तोही मिळालेला नाही.सर्वच समस्या आहेत कायमदेहेर्जें सारखे मोठा रोजगार देणारे व शेतीसाठी सिंचना सोय होणारे प्रकल्प आजही प्रलंबीत आहे़ तालुक्यात कोणताही मोठा उदयोग धंंदा अगर एमआयडी नसल्याने रोजगारासाठी येथील गरीब जनतेला भटंकती करुन दुस-या शहरात स्थलांतर करावे लागत आहे डी प्लस झोन मंजूर होऊनही तो फक्त कागदावरच राहीला आहे़. या तालुक्यातील ग्रामीण भागातील आजही लाखो कुटुंबे दारिद्रयरेषेखालील जीवन जगत खितपत पडले आहेत़ विक्रमगडला तालुक्याचा दर्जा मिळाल्याने स्वतंत्र निधी येऊ लागला असतांनाही आज शेती, रोजगार, शिक्षण,पाणी या समस्यांचे योग्य निराकरण होऊ शकलेले नाही़