शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना विसंगतीला सामोरे जावे लागते : डॉ. अरुणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:35 IST

अनेकदा वाचनातून, अनुभवातून, माध्यमातून, शिल्प, चित्र, नाटक, संगीतातून स्त्रीची रुपे पाहिली तरी स्त्री जीवन समजायला अवघड आहे असे मत डॉ. अरुढा ढेरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना विसंगतीला सामोरे जावे लागते : डॉ. अरुणा ढेरेलेखिका नयना सहस्त्रबुद्धे लिखित स्त्रीभान पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्नया पुस्तकात रोजच्या जीवनाशी सांधा भिडवला गेला : अभिराम भडकमकर

ठाणे : कुटुंबात बाईची मुळे जितकी खोल जातात तितकी ती विस्तारते. पुरूष शक्यतो पाय वर ठेवून उंच उडायला पाहतो आणि स्त्री शक्यतो खाली जाऊन वर बहरत जाते. आजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना विसंगतीला सामोरे जावे लागते. या विसंगतीचा स्वीकार करणे मोठी गरज आहे. स्त्री जीवनाचा विचार करुन त्यांना माणूस पातळीवर आणून त्यांचे हक्क अधिकार देणे खूप अवघड आहे अशा भावना मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केल्या.        सृजन संपदा, दिल्ली आणि अमेय प्रकाशन, पुणे आयोजित चिंतनशील लेखिका नयना सहस्त्रबुद्धे लिखित स्त्रीभान पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सहयोग मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, नाटककार आणि लेखक अभिराम भडकमकर, प्रकाशक उल्हास लाटकर उपस्थित होते. डॉ. ढेरे म्हणाल्या, अनंतकाळ गुढ असेच आपण स्त्रीला पाहत आलो याचे कारण स्त्री म्हणजे निमिर्ती आहे आणि त्याचा अनुभव वारंवार घेत आलो आहोत. माणूस म्हणून स्त्री पुरूष एकत्र येत नाही याचा विचार आपण करत नाही. भारतीय संस्कृती ही विसंगतीचा स्वीकार करणारी आहे. संस्कृती ही स्थिर गोष्ट नाही ती बदलत राहते. स्त्रीयांच्या सगळ््या प्रश्नांना, आकांक्षांना, प्रेरणांना, कतृत्वांना शब्द मिळाला तो साहित्यातून. तिचे पुरूष आणि स्त्रीयांकडूनही साहित्यातून प्रश्न मांडले गेले. भारतीय स्त्रीवाद किंवा दृष्टी ही पुरूषांविरोधी असूनच शकत नाही. त्याकाळात अनेक सुधारक पुरूष स्त्रीयांमागे उभे राहिले, यातून आकार मिळत गेला म्हणून पुरूष विरोध इथे झाला नाही. आजही सुशिक्षित स्त्रीया एकमेकांना भेटल्या तर त्यांचे विषय आणि पुरूषांचे विषय यात फरक असतो. पुरूष हे राजकारणाबद्दल तर स्त्रीया या रजा, बदली, मुलांचे करिअर, कुटुंब यांबद्दल बोलतात. स्त्रीयांनी राजकारणात प्रवेश करताना काही दृष्टी ठेवून करावा. स्त्रीया पारंपारिक वेढ्यात अडकल्यात, स्त्री प्रश्नांची, स्त्री जीवनाची अनेक अंगाने उकल करण्याची गरज आहे. आपल्याकडे स्त्रीवाद रुजला नाही आणि रुजणारही नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पुरुष घरातल्या स्त्रीयांबद्दल सन्मानाने बोलतात पण आजूबाजूच्या स्त्रीयांबद्दल मात्र तसे बोलत नाहीत अशी खंत व्यक्त करीत सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, समाजात सर्वच स्त्रीयांबाबत सन्मानाची भावना उमटावी अशी अपेक्षा सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली. नाटककार आणि लेखक अभिराम भडकमकर म्हणाले, या पुस्तकात रोजच्या जीवनाशी सांधा भिडवला गेला आहे. चिंतनशील लेखिका आणि चिंतनशील कार्यकर्तीचे जगणे यात उलगडले आहे. या पुस्तकातील स्त्रीभान स्त्री विरुद्ध पुरुष असे नसून यात पुरुष मानसीकतेचाही विचार केला आहे. हे पुस्तक संघर्षाचे नसून सहअस्तित्वाचे आहे. ते खऱ्या अर्थाने भारतीय समानता किंवा भारतीय स्त्री मुक्तीच्या दृष्टीने विचार करणारे असून माणूसपणाचे भान देणारे हे पुस्तक आहे. आपण स्त्री की पुरूष आहोत यापेक्षा आपण चांगले माणूस आहोत का़़? असा प्रश्न त्यांनी प्रेक्षकांसमोर उपस्थित केला. सुत्रसंचालन वृंदा टिळक यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक