शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीय माहिती घेऊन खात्यातील रक्कम लंपास

By admin | Updated: January 9, 2017 07:30 IST

बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून आॅनलाइन फसवणुकीचा प्रकार शहापुरात येथे घडला. विनोद सापळे असे या फसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो खर्डीजवळील पळशीण येथे राहणारा आहे.

शहापूर : बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून आॅनलाइन फसवणुकीचा प्रकार शहापुरात येथे घडला. विनोद सापळे असे या फसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो खर्डीजवळील पळशीण येथे राहणारा आहे. सापळे यांनी बहिणीच्या लग्नासाठी दीड लाख जमा केले होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी ते पैसे आपल्या बँक आॅफ बडोदाच्या शहापूर शाखेतील खात्यात जमा केले. गुरु वारी विनोद सापळे यांना एका नंबरवरून फोन आला. पलीकडील व्यक्तीने आपण स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगून जुन्या एटीएमकार्डऐवजी नवीन कार्ड हवे असल्यास त्या कार्डावरील पुढील आणि मागील बाजूची सगळी माहिती देण्यास सांगितले. सापळे यांच्या वडिलांचे म्हणजे भागवत सापळे यांचे एटीएमकार्ड बंद झाले होते. म्हणून, विनोद यांनी सगळी माहिती दिली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी आणखी एखादे एटीएमकार्ड असल्यास त्याचा नंबर मागितला. विनोद सापळे याने त्याच्या नावावरील बँक आॅफ बडोदाच्या एटीएमकार्डाचा नंबर आणि मागच्या बाजूचा नंबर दिला. ती माहिती देताच काही वेळानंतर बँक आॅफ बडोदाच्या खात्यातून कोणीतरी पैसे काढत असल्याचे लक्षात आले. थोडेथोडे करून एकूण ९८ हजारापर्यंत रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सापळे यांनी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली आहे. बँकेसंदर्भातील कोणतीही गोपनीय माहिती कोणाला देऊ नये, याबाबत वारंवार जागृती करूनही अशा घटना घडतच आहेत. (वार्ताहर)