शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांद्वारे लाटला टीडीआर

By admin | Updated: July 15, 2016 01:28 IST

बोगस कागदपत्रे सादर करून टीडीआर लाटणाऱ्या विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करण्याबरोबरच त्याच्यासह अन्य संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाईचे आदेश केडीएमसीचे

कल्याण : बोगस कागदपत्रे सादर करून टीडीआर लाटणाऱ्या विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करण्याबरोबरच त्याच्यासह अन्य संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाईचे आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले. या आदेशान्वये वाडेघर येथील मोहन रिजन्सी को.आॅप. सोसायटीची बांधकाम परवानगी रद्द केली आहे. वालधुनी येथील टीडीआर घोटाळा गाजत असताना आता या प्रकरणामुळे आणखी एका टीडीआर घोटाळ्याची त्यात भर पडली आहे. वाडेघर येथील कासम जुसब राजकोटवाला यांच्या भूखंडाचे कूलमुखत्यारपत्र बनवून त्याआधारे लॅण्डमार्क कन्स्ट्रक्शनने केडीएमसीकडून २००२ मध्ये बांधकाम परवानगी आणि तसेच वाढीव चटईक्षेत्र मिळवले. या परवानगीच्या आधारे संबंधित विकासकाने मोहन रिजन्सी सोसायटी उभारली आहे. दरम्यान, विकासकाने केलेल्या गैरप्रकाराबाबत तसेच केडीएमसी व राजकोटवाला यांच्या कुटुंबाच्या फसवणुकीप्रकरणी अंजुम खान व श्रीनिवास घाणेकर यांनी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे १६ फेब्रुवारी २०१३ ला तक्रार केली होती. या तक्रारीवर अप्पर पोलीस आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार सरकारच्या नगरविकास विभागाने २१ नोव्हेंबर २०१५ ला चौकशीचे आदेश महापालिकेला दिले होते. चौकशीत कागदपत्रांची वैधता व सत्यता तपासणीच्या दृष्टीने विकासक व जमीनमालक यांची सुनावणी झाली. यात केडीएमसीची फसवणूक झाल्याचेही उघडकीस आले आहे.