शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील १४ नगरसेवकांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 19:47 IST

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका जून महिन्यात झाल्या असून बहुमत असतांना पक्षातील बंडखोर नगरसेवकामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. असा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या १४ नगरसेवकांविरोधात भाजपचे अध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. याप्रकारणी भाजपातील ओमी टीम व इदनानी समर्थक नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार लटकली आहे.

उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका जून महिन्यात झाल्या असून बहुमत असतांना पक्षातील बंडखोर नगरसेवकामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. असा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. भाजपचे मात्र ओमी कलानी टीम व इदनानी समर्थक नगरसेवक पंचम कलानी, आशा बिराडे, रविंद्र बागुल, शुभांगी निकम, छाया चक्रवर्ती, डिंपल ठाकूर, दिपा पंजाबी, रेखा ठाकूर, सरोजनीं टेकचंदानी, हरेश जग्यासी, जीवन इदनानी, दीप्ती दुधानी, ज्योती चैनांनी व इंदीरा उदासी यांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करून त्याविरोधात मतदान केले. पक्षात शिस्त राखण्यासाठी व व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी २५ जुलै रोजी पक्षाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. 

भाजपतील बंडखोर तसेच ओमी कलानी टीम व इदनानी समर्थक नगरसेवकात याप्रकारने एकच खळबळ उडाली. यापूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौर पदी निवडून आणले. या ९ नगरसेवका विरोधातही भाजपाने कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. मात्र १८० दिवसात निर्णय न झाल्याने, भाजपने न्यायालयात दाद मागितली. यापूर्वी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली होती. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने रिपाइंच्या मदतीने सभापती पद राखले असून शिवसेना आघाडीत असलेले रिपाईचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपची ताकद वाढली आहे. 

भाजपची याचिका अवैध - ओमी कलानी भाजपने व्हीपचे उल्लंघन केले म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन याचिका दाखल केली. ती पूर्णतः अवैध असून नागरसेवका विरोधात काहीएक कारवाई होणार नाही. असे मत ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी दिली. तसेच जीवन इदनानी यांनीही काहीएक होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर