शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ठाण्यातील सर्व्हेत ८८८ खड्डे

By admin | Updated: July 14, 2016 01:44 IST

यंदा पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पावसाने त्यांचा दावा फोल ठरवला आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरात आजघडीला ८८८ खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : यंदा पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पावसाने त्यांचा दावा फोल ठरवला आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरात आजघडीला ८८८ खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये २ हजार १३८.२५ चौरस मीटरचे क्षेत्रफळ या खड्ड्यांनी व्यापले आहे. तर, यामध्ये सर्वाधिक २६४ खड्डे हे वागळे प्रभाग समितीत पडले आहेत. यापैकी ६७४ म्हणजेच १५९९.७५ चौरस मीटरचे खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ज्याज्या भागात ते बुजवले आहेत, त्यात्या ठिकाणी पुन्हा खड्डे होत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने शहरात चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत रस्त्यांना खड्डेच खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे मुंब्य्रात पालिकेला वेळ नसल्याने खड्डे बुजवण्याचे काम वाहतूक पोलिसांनी केल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, यंदाच्या पावसात रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा पालिकेचा दावा मात्र यानिमित्ताने खोटा ठरला आहे. ते बुजवण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी यापूर्वीच प्रत्येकी २५ लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार, आता ते बुजवण्याचे काम जेट पॅचर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे अवघ्या एक तासाच्या आतच रस्ता वाहतुकीसाठी खुला होत आहे. तरीही सर्वत्र कोंडी कायम आहे.