शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील निर्बंध उठवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:24 IST

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला.

ठाणे : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला. मात्र सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील निर्बंध उठवले असल्याला दुजोरा देणारा न्यायालयाचा आदेश अजून सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरही उपलब्ध नाही.हायकोर्टाने २०१४ साली दहीहंडीतील गोविंदाच्या वयाबाबत १८ वर्षांच्या वरील मर्यादेचे बंधन घातले. तसेच दहीहंडीची उंची २० फुटापर्यंतच असावी हेही निर्बंध घातले. त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि उत्सव साजरा झाला. ही स्थगिती ५६ दिवसांची होती. त्यानंतर स्थगिती उठली आणि २०१५ व २०१६ साली या उत्सवावर हे निर्बंध कायम राहीले. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून गोविंदा पथक नाराजी व्यक्त करीत होते. गेल्या वर्षी या दोन अटींविरोधात दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान गोविंदा पथकाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर्षी तरी दहीहंडीवरचे निर्बंध उठावे यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनी गणरायाला साकडेही घातले होते. १आॅगस्ट रोजी होणाºया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे गोविंदा पथकांचे डोळे लागले होते.दरम्यानच्या काळात गोविंदा पथकांनी सराव सुरू केला होता. मात्र त्याचा वेग मंदावला होता. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील सर्व निर्बंध रद्द केले असून पुन्हा नव्याने हायकोर्टात सोमवार ७ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यात सुरक्षितेतच्या उपाययोजनांबाबत राज्य शासनाने आपले म्हणणे मांडावयाचे आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय गोविंदांना दिलासा देणारा आहे म्हणून आम्ही सर्व गोविंदा पथकांनी याचा आनंद व्यक्त केला, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.