शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पाच संस्थांचा कुलकर्णींना पाठिंबा

By admin | Updated: November 17, 2016 07:16 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक मदन कुलकर्णी यांना नागपूरच्या पाच साहित्यिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

डोंबिवली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक मदन कुलकर्णी यांना नागपूरच्या पाच साहित्यिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या संस्थांनी कुलकर्णी यांना प्रथम क्रमांकाचे मत द्यावे, असे आवाहनही केले आहे.कुलकर्णी यांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांमध्ये साहित्य कला सेवा मंडळ, पद्मगंधा साहित्य संस्था, साहित्य विहार संस्था, रसिकराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था आणि अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था यांचा समावेश आहे. डोंबिवलीत होणाऱ्या या संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन साहित्यिक आहेत. त्यापैकी अक्षयकुमार काळे, जयप्रकाश घुमटकर आणि प्रवीण दवणे यांनी डोंबिवलीत येऊन काही मंडळींच्या भेटीगाठी घेतल्या, तर दवणे यांनी संमेलन आयोजक समितीच्या बैठकांपासून मुलाखतींपर्यंत मजल मारली आहे. दवणे यांची मुलाखत ‘श्रीकला संस्थे’ने घेतली. या संस्थेने अन्य उमेदवारांच्याही मुलाखती घ्याव्यात, अशी अपेक्षा साहित्यिक व वाचकांकडून व्यक्त होत आहे.कुलकर्णी यांनी अजूनही डोंबिवलीला भेट दिलेली नाही. ९ नोव्हेंबरनंतर ते शहरात येतील, असे सांगण्यात आले होते. परंतु, त्यांचे येणे झालेले नाही. त्यांची सगळी मदार नागपूरकडील साहित्यिक संस्था व मतदारांवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाच साहित्य संस्था या नागपूरच्या आहेत. या साहित्य संस्थांनी एक आवाहन प्रसिद्ध केले आहे. त्यात कुलकर्णी यांच्या साहित्यसेवेचा उल्लेख आहे. कुलकर्णी हे विदर्भ साहित्य संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. संशोधन व समीक्षा हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. प्राचीन मध्ययुगीन साहित्याविषयी त्यांना आस्था आहे. नव्या साहित्य प्रवाहाचे ते स्वागत करतात. नव्या साहित्याचा वेध घेत असताना साहित्यात पुन:पुन्हा त्याचत्याच विषयांची पुनरावृत्ती ते टाळतात. कविता प्रती, मुक्तोबोधांची कविता, दलित कवितेतील सूर्यप्रतिमा, कविता आणि सांगीतिक प्रतिमा, मराठीतील उपेक्षित गझलकार ही त्यांची कवितेसंदर्भातील पुस्तके पाहिली, तर नवा साहित्य विचार त्यांच्या लेखनातून दिसून येतो.