शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या सेल्फीतून मालमत्ताकरात सूट

By admin | Updated: February 18, 2017 06:44 IST

मतदान करण्यासाठी रहिवाशांनी पुढे यावे यासाठी निवडणूक अधिकारी व आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदाराने

उल्हासनगर : मतदान करण्यासाठी रहिवाशांनी पुढे यावे यासाठी निवडणूक अधिकारी व आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदाराने मतदान केल्यानंतर सेल्फी काढून तो महापालिकेने दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे. अशारितीने प्रत्येक वॉर्डातून प्रत्येकी ५ प्रमाणे ड्राद्वारे १०० मतदारांची लॉटरी काढण्यात येणार असून विजेत्यांना मालमत्ताकरात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जागृती अभियान रॅलीनिवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने मतदार जागृती अभियान रॅली काढली होती. त्यामध्ये राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त विजया कंठे, जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी झाले होते. मतदार जागृती अभियानांतर्गत चित्ररथ काढून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. शहराच्या विविध भागांतून मतदार जागृती रथ फिरवून मतदारांना मतदार केंद्र, नाव आदी माहिती घरपोच दिली जाणार असल्याचे या वेळी आयुक्तांनी सांगितले. त्यासाठी पालिकेने स्वच्छता निरीक्षक यांची नियुक्ती केली असून त्यांची नावे व फोन नंबरसह माहिती देण्यात आली आहे. उल्हासनगरातील मतदान टक्का अत्यंत कमी आहे. याबाबत, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी शहर दौऱ्यादरम्यान चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर, निंबाळकर यांनी हॉटेलमालक, व्यापारी संघटना, रिक्षा-चालक-मालक संघटना यांची बैठक घेऊन मतदार जनजागृती अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्व संघटनांनाही अभियानात सहभागी करून घेऊन अप्रत्यक्ष सहकार्य करणे सुरू केले आहे. हॉटेलमालक संघटनेने मतदान केल्याचा पुरावा दाखवा आणि हॉटेलात २० टक्के सूट मिळवा, असे प्रसिद्धिपत्रकच काढले आहे. (प्रतिनिधी)