शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेमुळे कलिंगडाला सुगीचे दिवस

By admin | Updated: March 31, 2017 06:11 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील तापमानात वाढ झाली असून या वाढत्या उष्णतेमुळे थंडगार कलिंगड खरेदीला मात्र

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील तापमानात वाढ झाली असून या वाढत्या उष्णतेमुळे थंडगार कलिंगडखरेदीला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या चार दिवसांत खरेदीत चांगली वाढ झाली असून शेदोनशे नव्हे, तर एका विक्रेत्याकडून दिवसाला तब्बल ५०० कलिंगडांची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. नको तो उन्हाळा, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या त्रस्त भाव दिसून येत आहेत. रणरणत्या मार्च महिन्यात उकाड्याने समस्त ठाणेकर हैराण झाले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारा ४० अंशांच्या पलीकडे गेला आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, छत्री, स्कार्फ, सनकोटचा आधार घेतला जात आहे. अंगाची लाहीलाही झाली असताना ठाणेकर थंड पेय, थंड फळांकडे वळत आहे. पन्हं, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, सरबत याचबरोबर कलिंगडांच्या खरेदीकडे ठाणेकरांनी मोर्चा वळवला आहे. कलिंगड हे पोटाला थंडावा देणारे फळ असल्याने उन्हाळ्यात त्याची हमखास खरेदी केली जाते. गतवर्षी कलिंगडखरेदीला उतरती कळा होती. परंतु, यंदा त्यात दुपटीने वाढ झाली असल्याचे फुरखान या विक्रेत्याने सांगितले. एक महिन्यापासून कलिंगड बाजारात आले असले, तरी चार दिवसांपासून कलिंगडखरेदीत तुफान वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाला ४०० कलिंगड आम्ही विकले. या आठवड्यात हा आकडा ५०० वर गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आकाराप्रमाणे कलिंगडाचे दर असून ३० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत प्रतिनग विक्री सुरू आहे. यात ५०, ६० आणि ७० रुपयांच्या कलिंगडाची खरेदी अधिक प्रमाणात करीत असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. सकाळी कलिंगडाच्या खरेदीसाठी झुंबड असते. बाजारपेठांपेक्षा रस्त्याच्या कडेला कलिंगडांचे डोंगर रचलेले दिसून येतात. सध्या आम्ही ८० टन कलिंगडं विक्रीसाठी असून, यापैकी ६० टन कलिंगडं विकली. गतवर्षी हा आकडा ३० ते ३५ टन इतका होता, असे फुरखान याने सांगितले. (प्रतिनिधी)माणगाव, खेडवरून आवकमाणगाव आणि आता खेडवरून कलिंगडांची आवक होत आहे. २० मे पर्यंत कलिंगडखरेदी सुरू राहील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. कलिंगडांबरोबर कलिंगडांच्या खापा करून त्याची एक प्लेट १५ रुपये दराने विकली जात आहे.