शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

अशी आहे रोहावरोहणाची ध्वजसंहिता

By admin | Updated: August 11, 2015 23:53 IST

कुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली

- भाग्यश्री प्रधान, ठाणेकुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. जिल्हा पोलीस मुख्यालयात व आयुक्तालयात ध्वजारोहण करतांना आणि ध्वज उतरविताना तीन कॉन्स्टेबल एक हवालदार आणि एक पोलीस उपस्थित असतात. ते राष्ट्रध्वजाला यावेळी मानवंदना देतात. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय आदी शासकीय कार्यालयातही दोन कर्मचारी हे काम करतात. ध्वज ज्या दोरीच्या आधारे फडकविला जातो ती दोरीही कॉटनचीच असते. ३० फुट लांबीच्या ध्वजस्तंभासाठी सुताची ६० फुट लांब दोरी वापरली जाते. ध्वज बांधण्यासाठी ध्वजाची शिलाई करतानाही ही दोरी ध्वजाशी जोडली जाते. ध्वज खांबावर टोकाशी असणाऱ्या लाकडी फिरत्या चकतीच्यामध्ये ही दोरी ठेवली जाते आणि त्यानंतर त्या ध्वजाच्या दोरीलाच मुख्य दोरी जोडून ध्वज चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी तिचा वापर केला जातो. हा ध्वज उतरविल्या नंतर तो जमिनीला लागणार नाही अशा रितीने त्याची घडी घालून ती व्यवस्थित ठेवण्याची जबाबदीरीही सामान्य प्रशासन खात्याकडेच असते. या तिरंग्याची रचना मच्छलीपट्टणम येथे जन्मलेल्या पिंगी व्यंकैय्या यांनी केली आहे. त्यातील भगवा(केशरी) रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतिक आहे तर हिरवा रंग समृध्दीचे प्रतिक असल्याचे मानले जाते. मधल्या पांढऱ्या पट्टयावर असलेले अशोकचिन्ह हे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असणाऱ्या सिंहमुद्रेवर असणाऱ्या अशोकचक्रासारखे आहे. जीवन गतीमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असेही हे अशोकचक्र दर्शविते. हे चक्र सागराची अथांगता, कालचक्र आणि त्याचबरोबर बदलत जाणारे जग सूचित करते, असा या राष्ट्रध्वजाचा अर्थ तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाला ६८ वर्षे पुर्ण झाली आहेत. या तिरंग्याचा सन्मान व्हावा यासाठी अनेक संस्थाही कार्यरत आहेत.