शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सीडर्मीसाठी सफाळेत पक्ष्यांवर विषप्रयोग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:43 IST

चविष्ट मांसासाठीही केली जाते शिकार

पालघर : सफाळे व परिसरातील पाणथळ जमिनी, मिठागरातील भक्ष्य शोधण्यासाठी येत असलेल्या पक्ष्यांवर विषप्रयोग करून त्यांना भाजून त्यांच्या चविष्ट मांसावर ताव मारणाऱ्या टोळ्या सफाळे परिसरात सक्रिय झाल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वन विभागाने कडक कारवाईची मागणी केली जात आहे.सफाळे परिसरात मोठ्या प्रमाणात सागरी किनारा, खाडी, मिठागरे अशा पाणथळ जमिनीची उपलब्धता आहे. अशा ठिकाणी मिळणाऱ्या खाद्याच्या शोधार्थ फ्लेमिंगो, पानकावळे, चक्रवाक, ब्लॅक हेडेड आयबीस, पेंटेड स्टोर्क आदी स्वदेशी तसेच परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. या पक्ष्यांची बंदुकीद्वारे शिकार करण्याप्रकरणी वनविभागाने स्थानिकांना बंदुकीसह पकडले होते. परंतु २ एप्रिल रोजी काही स्थानिक पर्यावरण आणि प्राणिप्रेमींना घार, बगळे आदी पक्षी मृतावस्थेत तर काही जखमी अवस्थेत सापडले होते. काही पक्ष्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृत मासे किंवा मृत बेडकामध्ये कीटकनाशके, सहज उपलब्ध होणारे विष कालवून ते किनाऱ्यालगत ठेवल्यावर माश्यांवर ताव मारण्यासाठी येणारे पक्षी आपला जीव गमावून बसत असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पक्ष्यांचे पोटातील अवयव काढून त्यात भुसा भरून ते पक्षी शोभिवंत वस्तू (टॅक्सीडर्मी) म्हणून विकणारी टोळी तर या भागात सक्रिय नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. वनविभागाचे अपयशसफाळे परिसरात मृतावस्थेतील पक्ष्यांचे नमुने घेऊन ते शवविच्छेदनासाठी वनविभागाने पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पक्ष्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. दरम्यान, पक्ष्यांना मारण्याच्या घटनांत वाढ होत असून, सफाळे वनविभागाचे अधिकारी मात्र या पक्ष्यांच्या मारेकऱ्यांना रोखण्यात अपयशी ठरत आहेत.