शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा शोध परीक्षेत ठाणेकर विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 06:19 IST

आॅनलाइन निकाल जाहीर : दुसरी इयत्तेत जिल्ह्यातील ४ विद्यार्थी राज्यातून प्रथम

ठाणे : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. दुसरी इयत्तेसाठी झालेल्या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर सहावी इयत्तेसाठी झालेल्या परीक्षेत कल्याणचा ऋतुज राऊतला ३०० पैकी २९२ गुण मिळाले असून तोही प्रथम आला आहे.

दुसरी इयत्तेच्या निकालात ठाण्याच्या संकेत विद्यालयाची आर्या आदक, भगवती विद्यालयाचा तेजस घैसास, बदलापूरच्या कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा दक्ष पवार आणि कल्याणच्या बा.ल. दळवी बालक मंदिर शाळेतील विभा सरोळकर या चौघांनीही १०० पैकी १०० गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सहावी इयत्तेच्या निकालात कल्याणच्या के. सी. गांधी हायस्कूलचा ऋतुज राऊत याने ३०० पैकी २९२ गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

कल्याणच्याच श्री महावीर जैन इंग्लिश स्कूलचा कुणाला राणे हा २७६ गुणांसह चौथा आला आहे. सातवी इयत्तेच्या निकालात डोंबिवलीच्या सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडीयम स्कूलची वैदेही शेट्ये ही २६८ गुणांसह राज्यात दुसरी आली आहे. त्याच शाळेची इशा लेले ही २५६ गुणांसह १५ वी आणि सेंट थॉमस हायस्कूलचा सुब्रताकुमार पाध्य हा १७ वा आला आहे.

अशी आहे मेरीट लिस्टमहाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या निकालाची मेरीट लिस्ट आॅनजाहीर झाली. दुसरी इयत्तेसाठी झालेल्या परीक्षेच्या मेरीट लिस्टमध्ये ठाणे जिल्ह्यातील १५ मुले आहेत. तिसरी इयत्तेच्या मेरीट लिस्टमध्ये २१, चौथीच्या लिस्टमध्ये ४४, सहावीच्या लिस्टमध्ये २१ तर सातवीच्या लिस्टमध्ये जिल्ह्यातील २० मुले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरच्या विविध शाळांचे हे विद्यार्थी आहेत.