शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना व्हावे लागते आहे बालमजूर

By admin | Updated: May 8, 2017 05:49 IST

एका बाजूला सरकार आदिवासी विकासाचा ढोल वाजवत असतांना दुसरीकडे मात्र आदिवासी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवसांत पुढील वर्षांसाठीचे शैक्षणिक

शौकत शेख/लोकमत न्यूज नेटवर्कएका बाजूला सरकार आदिवासी विकासाचा ढोल वाजवत असतांना दुसरीकडे मात्र आदिवासी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवसांत पुढील वर्षांसाठीचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी मोगरा, चिकू बागेत, भाजीपाल्याची ओझी वाहणे किंवा हॉटेल अथवा रसवंतीत बालमजूर होणे भाग पडत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. चिंचणी, वाढवण, वरोर ते झाईपर्यंत एक महिना काम करणाऱ्यासाठी करजगाव, वसा, आच्छाड, वंकास, धुंदलवाडी, मोडगाव भागांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी सद्या बंदरपट्टी भागातील शेती, बागायतीत कामे करण्यासाठी दाखल झाले आहेत. आदिवासी मुला, मुलींना वह्या, पुस्तके मोफत देत असल्याचा शासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क देण्यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये अमलात आणण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, निवासी आश्रमशाळा, महाविद्यालये यांना मंजूरी देण्याचे काम शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. उद्देश एवढाच होता की गरीब, गरजू आदिवासी दुर्गम भागांत राहणाऱ्या प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क बजावता आला पाहिजे. शासन स्तरावरून यासाठी अनेक वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. शाळांना अनेक अनुदाने वितरीत करण्यात आली. शिवाय बालकांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, पेयजल, शौचालय, वाचनालय अशा सुविधा पुरवून शाळा भौतिक सुविधांनी सबल करण्यात आल्या आहेत. डहाणू, जव्हार, तलासरी या भागात वस्तीशाळा, सेतू शाळा, हंगामी वस्तीगृहे अशा सुविधा पुरवून मुलांची उपस्थिती वाढविण्यात आली आणि टिकवून ठेवली आहे. सद्यस्थितीमध्ये शाळांना चांगले रंगरुप चढल्यामुळे सामान्य माणसाची नजर त्याकडे पडू लागली आहे. यासाठी महाराष्ट्रात जलद प्रगती शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाची राबवणूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुे डिजिटल शाळा, ज्ञान रचनावादी शाळा, आनंददायी शाळा जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहे. अशी आकडेवारी आज अधिकारी देत आहेत. या सर्व योजना व उपक्रम शासन जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी करीत असेल तर ती बाब शहरापूरती मर्यादीत राहिल.महाराष्ट्रातील सर्व शाळा आय.एस.ओ. डिजिटल, ज्ञानरचनावादी करण्याच्या कार्यात शासन गुंतलेले असताना डहाणू, तलासरी मधील शाळेत जाणाऱ्या मुलांना मात्र वेगळीच भ्रांत पडली आहे.साधारणत: जून महिना सुरु झाला कि पालक-बालक यांना शाळा सुरु होण्याचे वेध लागतात. त्यासाठी मग पालक गणवेश वह्या, पुस्तके, दप्तर, रेनकोट, बुट तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. त्यासाठी लागणारा पैसा हाती यावा म्हणून हे आदिवासी विद्यार्थी सध्या सुटी व मौजमजा विसरून अल्पदरात बालमजूर झाले आहेत. हे सरकारला माहित आहे काय?