शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

‘मोटू बना पतलू’मधून विद्यार्थ्यांनी सांगितले योगाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या वर्षभराच्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकजण योग करतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या वर्षभराच्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकजण योग करतात. पण ते नेमके कसे करावे किंवा त्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने ठाण्यातील संकल्प इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक यांनी योग विषयावर आधारित 'मोटू बना पतलू' हा मूक लघुचित्रपट बनवला आहे. चित्रपट महामंडळात ही कथा रजिस्टर आहे.

संकल्प इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वेळापत्रकात योगाची तासिका ठेवून योगाभ्यास अनिवार्य आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना घरी योग करण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. यातूनच शाळेने विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या सहभागाने योग विषयावर आधारित लघुपट यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करायचे ठरवले होते. त्यातूनच हा मूक लघुचित्रपट तयार केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी ही कथा लिहिली आहे. शरीराचे वाढते वजन प्रत्येकासाठी अत्यंत धोकादायक असते. असे शरीर अनेक आजाराचे माहेरघर बनते. शिवाय अशी व्यक्ती समाजाच्या चेष्टेचा विषय बनू शकते. आजच्या जीवनशैलीने लहानपणापासून लठ्ठपणाचा विकार आपणास ग्रासू शकतो. परंतु डॉक्टरांचा योग्य सल्ला, पूरक आहार, खेळ व योगाच्या साहाय्याने लठ्ठपणा घालवू शकतो. असे सांगणारी ही कथा आहे.

कथेचे दिग्दर्शन याच शाळेची माजी विद्यार्थिनी साक्षी हिने केले असून ८ वीचा विद्यार्थी साईराज याने शूटिंग, एडिटिंग या बाजू सांभाळल्या आहेत. या शॉर्टफिल्ममध्ये प्रमुख भूमिकेत इयत्ता ७ वीचा विद्यार्थी ऋषभ कुडासकर व ओम राठोड असून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मुख्याध्यापकांनीही आपली भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प खर्चात तयार केलेली व योग्य संदेश देणारी अशी शॉर्टफिल्म आहे. अनेकांच्या सहकार्यामुळे शॉर्टफिल्म अत्यल्प खर्चात झाली असे या या लघुचित्रपटाचे निर्माते व शाळेचे संस्थाचालक डॉ. राज परब यांनी सांगितले.

आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या प्रसंगी जयंत भावे, राजेंद्र गोसावी आणि डॉ योगेश जोशी उपस्थित होते.