शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शिक्षणापासून वंंचित?

By admin | Updated: September 13, 2016 02:08 IST

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठीची भटकंती थांबविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून २०१४ मध्ये ८ वीचे वर्ग सुरु झाले.

भार्इंदर : पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठीची भटकंती थांबविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून २०१४ मध्ये ८ वीचे वर्ग सुरु झाले. मात्र राज्यातील युती सरकारने ही इयत्ता प्राथमिक शिक्षणात समाविष्ट केल्यामुळे त्यापुढील माध्यमिक शिक्षणासाठी पालिकेच्या स्वतंत्र शिक्षण समितीअभावी ८वी उत्तीर्ण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी भटकंती करावी लागते. अगोदरच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या विद्यार्थ्यांना खाजगी शाळांत प्रवेश मिळविण्यासाठी धडपडावे लागते. या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुकावे लागू नये, यासाठी पालिका दरवर्षी खाजगी शाळांतील प्रवेशाची मोहीम राबवते. या मोफत व सवलतीच्या मोहिमेला काही खाजगी शिक्षण संस्था चालक प्रतिसाद देत नसल्याने हे विद्यार्थी माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठी होत असलेली कुचंबणा संपुष्टात आणण्याकरिता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आसिफ शेख यांनी २०१२ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांकडे माध्यमिक शिक्षणाचे वर्ग पालिका शाळांतच सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार डिसेंबर २०१३ मधील महासभेत माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरु करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्याला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पालिकेने ८वीचे ७ वर्ग सुरु केले. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाचे दरवाजे खुले झाले असतानाच विद्यमान युती सरकारने ८ वीतील शिक्षणाला प्राथमिकचा दर्जा बहाल केला. त्या पुढील ९ वी ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाला माध्यमिक दर्जा देत त्यासाठी स्वतंत्र शिक्षण समिती स्थापन करण्याची अट घातली. ही समिती संपूर्णपणे पालिकेच्या अखत्यारीत असली तरी त्याला शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली आहे. यामुळे माध्यमिक शिक्षणासह त्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा खर्च पालिकेला सोसावा लागणार आहे. परिणामी माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरु करण्याची प्रक्रिया तूर्तास गुंडाळण्यात आली आहे. पालिकेच्या तत्कालीन महासभेत शिक्षण समितीसह विविध समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतरही त्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. यामुळे पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची भटकंती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)