शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

करवसुलीसाठी विद्यार्थ्यांचा आधार

By admin | Updated: November 17, 2016 07:30 IST

मीरा-भार्इंदर पालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातून जमा करण्याच्या मोहिमेंतर्गत सुमारे १२ कोटींचा मालमत्ताकर वसूल केला आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातून जमा करण्याच्या मोहिमेंतर्गत सुमारे १२ कोटींचा मालमत्ताकर वसूल केला आहे. ही वसुली एकूण उद्दिष्टांपैकी सुमारे साडेआठ टक्के एवढीच असल्याने ती अधिकाधिक होण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एक हजार, पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी पालिकेला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तत्पूर्वी पालिकेने चलनातून बाद झालेल्या नोटा १० नोव्हेंबरपासून कराच्या माध्यमातून स्वीकारण्यास सुरुवात केली. १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत पालिकेने विविध करांच्या माध्यमातून सुमारे २४ कोटींची वसुली केली. हा आकडा १६ नोव्हेंबरपर्यंत ४ कोटींनी वाढला. एकूण २८ कोटींची करवसुली पालिकेने जुन्या नोटांच्या आधारावर वसूल केली असली तरी कित्येकांनी आपले काळे धन कराच्या माध्यमातून पांढरे केल्याचे बोलले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पाडण्याची संधी मिळाल्याने ती कोणत्याही परिस्थितीत घालवायची नाही, असा निर्धार आयुक्तांनी केला आहे. त्यासाठी १३ नोव्हेंबरपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना करदात्यांच्या दारी धाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तासागणिक वसुलीचा आकडा वाढत असला तरी तो पर्याप्त ठरलेला नाही. पालिकेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात केवळ मालमत्ताकराचे एकूण उद्दिष्ट १४० कोटींचे निश्चित केले आहे. आजमितीस करवसुली ४२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यात यंदाच्या १२ कोटींचा समावेश आहे. एकूण उद्दिष्टांपैकी साडेसात महिन्यांत पालिकेने एकूण ३० टक्के करवसुली केली असून उर्वरित साडेचार महिन्यांत पालिकेला ७० टक्के मालमत्ताकराची वसुली करावी लागणार आहे. ती २४ नोव्हेंबरपर्यंत अधिकाधिक होण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे करवसुलीची मोहीम सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)