शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

सुदृढ बालक स्पर्धेला उदंड प्रतिसाद

By admin | Updated: August 10, 2015 23:40 IST

जॉन्सन बेबी आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढ बालक स्पेर्धेचे ९ आॅगस्ट रोजी वसंतराव नाईक सभागृह बी केबीन ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते

ठाणे : जॉन्सन बेबी आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढ बालक स्पेर्धेचे ९ आॅगस्ट रोजी वसंतराव नाईक सभागृह बी केबीन ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० हून अधिक बालके सहभागी झाली होती. या सर्व निरागस आणि गोंडस बालकांमुळे सभागृहात खेळीमेळीचे वातावरण दिसून येत होते. डॉक्टरांसोबत चर्चा करून पाल्याच्या आरोग्याविषयी असणाऱ्या शंकाचे निरसन करण्याच्या संधीचाही पालकांनी लाभ घेतला. पहिला गट ०-१ वर्ष, दुसरा गट १-३ वर्ष आणि तिसरा गट ३-५ वर्ष अशा एकूण तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. यातील ०- १ या पहिल्या गटात आरोही पालवे, रिदिमा गोरे, रिशी हुमणे यांनी बाजी मारली. १-३ या दुसऱ्या गटात स्पर्श नेवळे, गायत्री कदम, श्लोक चौधरी हे विजयी ठरले. ३-५ या तिसऱ्या वयोगटातील गटात युक्ता जैन, नम्रा सय्यद, किंजल नाईक यांनी ही स्पर्धा जिंकली. यावेळी इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रीक्स , ठाणे तर्फे डॉ. जितेश शाह, डॉ. शरयू पाटील, डॉ. सोनाली मुथा तसेच डॉ. अक्षय भोईर यांनी परिक्षण केले. प्रत्येक पालक पाल्याच्या आरोग्यासाठी तितकेच सतर्क असल्याचे स्पर्धेच्या निमत्तिाने दिसत होते. मुलींनी परीची तर मुलांनी कृ ष्णाची वेषाभूषा केली होती. फुलपाखरांसारखे आयुष्य जगणाऱ्या या लहानग्यांनी स्पर्धेतही स्वच्छंदी भाग घेतला होता. पुरस्कार मिळणार की नाही याची कोणतीही फिकीर त्यांना नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त स्पर्धेतील धमाल एन्जॉय करायला मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. डोरेमॉन या बच्चे कंपनीच्या आवडीच्या कार्टुन्सनेही सभागृहात हजेरी लावली होती. तसेच सभागृहात ठेवण्यात आलेल्या खेळण्यांमुळे बच्चे कंपनीचा रविवारही फनी वार म्हणूनच साजरा झाला. तसेच सभागृहात लावलेल्या गाण्यांवर नाचण्याचा मोह बच्चे कंपनीला आवरता आला नाही. यावेळी प्रसिध्द डॉ. रमेश अय्यर आणि डॉ सुरेश वानखेडे यांनी उपस्थित मातांना पाल्याच्या आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. पाल्यांना लसीकरण का द्यावे याची माहिती उपस्थित पालकांना दिली. भारतात २-३ तासात ७५ स्त्रियांचा कॅन्सरने मृत्यू होतो असे सांगितले तर दिवसाला २५० महिला कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. स्वाईन फ्ल्यूसाठी नवीन लस उपलब्ध करण्यात आली असून ६ महिन्यानंतर स्वाईन प्ल्यूची लस बालकांना द्यावीच लागेल, असेही त्यांनी सांगितले. बाळाला जन्मल्यापासून १ वर्षच ब्रेस्ट फिडींग करावे, असा सल्लाही डॉ. आय्यर यांनी दिला.बाळाच्या आरोग्याला साजेशी अशी शुध्द, सौम्य संवेदनशील आणि वैद्यकीय परिक्षणांतून सिध्द झालेली उत्पादने निर्माण करण्याची उज्ज्वल परंपरा जॉन्सन बेबी ला लाभलेली आहे . कंपनीची सर्व उत्पादने गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता कठोर वैद्यकीय चाचण्यांतून पार पाडतात. म्हणून गेल्या १०० वर्षांपासून लहान मुलांची काळजी घेण्याबाबत एक विश्वासू नाव म्हणून जॉन्सन बेबीची ओळख आहे. सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशा तिहेरी लाभयुक्त उत्पादनांद्वारे ग्राहकांना नेहमी दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण सेवा पुरविण्यासाठी कंपनी नेहमी तत्पर राहिली आहे. यावेळी जॉन्सन बेबी टीमचे वैभव पडवेकर, मनोज शिरसाठ, कुमार पुष्पांकर तसेच बिझनेस हेड भूपेश मालाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉक्टरांनी पालकांशी साधलेल्या संवादामुळे खूप माहिती मिळाली. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधीही मिळाली. मी डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या लसी मुलांना देणार आहे. तसेच देशातील मुले हेल्दी असतील तरच ते देशाचा आधारस्तंभ ठरू शकतात. जॉन्सन आणि लोकमतचे या स्पर्धेबद्दल आम्ही आभारी आहोत.- पिंकी सोधाजॉन्सन बेबी तर्फे देण्यात आलेला हेल्दी बेबी कीट खूप उपयोगी आहेत. माझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी मी नेहमी जॉन्सन बेबीची उत्पादने वापरते. त्याने कुठलेही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे प्रत्येक बाळाच्या स्वास्थ आणि मुलायम त्वचेसाठी जॉन्सन बेबीच वापरावे, असा मी त्यांना सल्ला देईन. तसेच लोकमत आणि जॉन्सनने राबिवलेला हा उपक्रम फार सुंदर होता.संगीता मोरे , ठाणे बाळाची त्वचा प्रौढ व्यक्तीच्या त्वचेहून खूप वेगळी असते. कारण ती फार नाजूक आणि संसर्गाचा लवकर परीणाम होणार आहे.डॉ. सुरेश वानखेडे (अध्यक्ष आयएपी, ठाणे)प्रौढांसाठी असलेली उत्पादने बाळासाठी वापरल्यावर त्यांना त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते.डॉ राम गोपाल छाजेरा (सेक्रेटरी, आयएपी, ठाणे)