शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम टप्प्याची मासेमारी बंद करा, अन्यथा संघर्ष!

By admin | Updated: May 24, 2017 00:55 IST

समुद्रात २५ मे ते ३० मे दरम्यानच्या बंदीच्या शेवटच्या टप्प्यात समुद्रात जाऊन बंदी कालावधीत १ जून नंतर समुद्रात राहून मासेमारी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमार

हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : समुद्रात २५ मे ते ३० मे दरम्यानच्या बंदीच्या शेवटच्या टप्प्यात समुद्रात जाऊन बंदी कालावधीत १ जून नंतर समुद्रात राहून मासेमारी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमार व त्यांच्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा संघर्ष उद्भवेल असा इशारा सातपाटी मच्छीमार संस्था व सर्वोदय मच्छीमार संस्थेने आयुक्तांना दिला आहे.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांन्वये १ जून ते ३१ जुलै हा अवघ्या ६१ दिवसाचा कालावधी हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी मच्छीमारीसाठी बंद असतो. वादळी वाऱ्यामुळे होणारी जीवितहानी, वित्तहानी टाळली जावी व प्रजनना नंतर पिल्लाची पोषक वाढ होऊन हंगामात मुबलक मच्छी उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश आहे. या पावसाळी मासेमारी बंदी कालावधीची अंमलबजावणी पालघर जिल्ह्यातील मच्छिमार काटेकोरपणे करीत आले आहेत. मात्र रायगड,गुजरात मधील काही मच्छीमारीसाठी ससून डॉक (गोदी), कुलाबा येथे वर्षभर येत असतात. तेथून ते पावसाळी बंदी कालावधीच्या आधी २५ ते २८ मे ला कुलाबा बंदरातून माघारी जातांना १ जून नंतर १२ ते १५ दिवस पावसाळी बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी करतात व त्यांची विक्री आपल्या गावाकडील बंदरात करतात. मुंबई शहर, मुंबईउपनगर, ठाणे जिल्ह्यातील उत्तन तर रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारही अशाच पद्धतीने मासेमारी करीत असल्याचे अनेक वर्षांपासून निदर्शनास आले आहे. हे पावसाळी मासेमारी बंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याने या नौकाद्वारे पकडण्यात आले मासे विक्रीसाठी कुठल्याही बंदरात उतरवू देऊ नयेत. प्रत्येक बंदरावरील परवाना अधिकाऱ्यांनी या बोटीवर लक्ष ठेवून प्रत्येक मासळी उतरविण्याच्या बंदरावर त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवावा अशी मागणी करण्यात आली असून असे प्रकार आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमान्वये कारवाई करावी अशी मागणी सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे चेअरमन रवींद्र म्हात्रे आणि सातपाटी मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तां कडे केली आहे.