शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गावात पाऊल ठेवाल, तर तंगड्या तोडू!

By admin | Updated: May 22, 2016 01:40 IST

कल्याण ग्रोथ सेंटरच्या आडोशाने दहा गावांतील स्थानिकांच्या जमिनी हडप करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. त्यासाठी गावात पाऊल ठेवले, तर तंगड्या तोडू असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण

चिकणघर/कल्याण : कल्याण ग्रोथ सेंटरच्या आडोशाने दहा गावांतील स्थानिकांच्या जमिनी हडप करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. त्यासाठी गावात पाऊल ठेवले, तर तंगड्या तोडू असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या सभेत देण्यात आला. या गावांतील अतिक्रमणे तोडण्यासाठी कोणी आले, तर त्याचीही तीच गत करू, असे नेत्यांनी बजावले.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्यावेळी २७ गावे महापालिकेतून वगळण्याचे आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल आणि त्यासाठी काम करत असलेल्या लॉबीबद्दल त्यांनी भाजपा सरकार, भाजपाचे नेते आणि शब्द न पाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांतील १० गावे एमएमआरडीएकडे सोपवून त्यात ग्रोथ सेंटर स्थापन करण्याची अधिसूचना नुकतीच राज्य सरकारने काढली. त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही सभा बोलवण्यात आली होती. स्वतंत्र नगरपालिकेचे घोंगडे भिजत ठेवून ग्रोथ सेंटरच्या नवाने २७ गावे तोडण्याचा प्रयत्न सरकार करीत असेल तर त्यास विरोध करण्यासाठी संघर्ष समिती जोरदार आंदोलन करून रस्त्यावर उतरेल, असा इशारा नेत्यांनी दिला. तसेच शिवसेना-बाजपाचे उमेदवार रवींद्र पाटक यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार वसंत डावखरे यांना पाठिंबा दिल्याचा पुरूच्चार केला. या सभेला समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सहा नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेने स्थानिकांमध्ये भांडणे लावून, तेढ निर्माण करून सत्तेचे राजकारण केले. त्यामुळे आज या २७ गावांची अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी केली. अर्जुनबुवा चौधरी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री भेटीसाठी समितीला झुलवत ठेवून २७ गावांना महापालिकेत जोडण्याची अधिसूचना शासनाकडून काढून घेतली, असा आरोप केला. मनसेचे प्रतिनिधी प्रकाश माने यांनी संघर्ष समितीच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या सभेसाठी २७ गावांतील २२ नगरसेवकांपैकी फक्त सहा नगरसेवक उपस्थित होते. दमयंती वझे, डॉ. सुनीता पाटील, इंदिरा तरे, शैलजा भोईर, जालंदर पाटील, महेश पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर/प्रतिनिधी)