शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडूनच मराठीची गळचेपी

By admin | Updated: April 1, 2017 05:59 IST

राज्याची राजभाषा असलेल्या मराठीची सरकारच्याच विविध विभागांकडून गळचेपी केली जात आहे

मीरा रोड : राज्याची राजभाषा असलेल्या मराठीची सरकारच्याच विविध विभागांकडून गळचेपी केली जात आहे. तब्बल ४५ संकेतस्थळे ही इंग्रजी भाषेत असून मराठी भाषेत संकेतस्थळ करण्यास उदासीन असलेल्या संबंधित विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूदच नसल्याचे उत्तर मराठी भाषा विभागाच्या अधिकारी लीना धुरू यांनी माहिती अधिकारात दिली आहे. मराठीला डावलणाऱ्या संबंधित विभागांच्या प्रमुखांवर कर्तव्यात कसूर आणि सरकारी आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी शिस्तभंग व निलंबनाच्या कारवाईची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. मराठीला राजभाषा म्हणून १९६६ मध्ये जाहीर केले. मात्र, त्यानंतरही मराठीचा वापर वाढलेला नाही. काँग्रेस आघाडीच्या काळात २९ जानेवारी २०१३ च्या परिपत्रकानुसार पत्रव्यवहार, सरकारी निर्णय, अधिसूचना, संकेतस्थळे, परिपत्रके मराठीतून करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या होत्या. नागरिकांना सरकारच्या विविध योजना, धोरण, निर्णय याची माहिती मराठीत दिल्यास ते सोयीचे ठरते. पण, ही माहिती मराठीत नसल्याने नागरिकांना अडचण होते, याकडे समितीचे गोवर्धन देशमुख यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागांचा समावेश२७ जानेवारी २०१७ मध्येही सरकारच्या मराठी भाषा विभागाने परिपत्रक काढून पुन्हा सर्व विभागांना मराठीचा वापर व आदेशानुसार काटेकोर कारवाई करण्यास कळवले होते. शिवाय, मराठीत नसणाऱ्या विविध विभागांच्या तब्बल ४५ संकेतस्थळांची यादी धुरू यांनी जोडली होती. परंतु, त्यानंतरही संकेतस्थळे मराठीत झाली नसल्याचे धुरू यांनीच मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना दिलेल्या माहिती अधिकाराच्या उत्तरात नमूद केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह, नगरविकास यासह एकूण १८ विभागांची ही ४५ संकेतस्थळे आहेत.