शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रदर्शनामुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था

By admin | Updated: October 14, 2016 06:24 IST

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांतील गृहसंकुलांचे नुकतेच प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी कात्रप विद्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान

पंकज पाटील / अंबरनाथअंबरनाथ आणि बदलापूर परिसरांतील गृहसंकुलांचे नुकतेच प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी कात्रप विद्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान दिले होते. हे मैदान सुस्थितीत ठेवण्याची अट घातली होती. मात्र, तरीही आयोजकांनी या मैदानाची दुरवस्था केली आहे. मैदानाचे सपाटीकरणही खराब झाल्याने क्रीडापटूंना वापरण्यायोग्य हे मैदान राहिलेले नाही. गृहप्रदर्शन आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर असलेल्या तालुका क्रीडा संकुलावर अनेक खेळाडू हे नियमित खेळण्यासाठी येतात. पावसाळा असल्याने या क्रीडा संकुलाचा वापर चार महिने होत नाही. मात्र, दसरा उलटल्यावर या मैदानाची स्वच्छता स्वत: क्रीडा रसिक करतात आणि ते मैदान खेळण्यासाठी पूर्ववत करतात. या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी अनेक खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. क्रिकेटचे सामने येथे होतात. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोठी मैदाने कमी असल्याने अनेकजण याच ठिकाणी सरावासाठी येतात. फुटबॉल असो वा क्रिकेट या सर्वांचे सरावही या क्रीडा संकुलात होतात. एवढेच नव्हे तर धावण्याचा सरावही येथे केला जातो. त्यामुळे जिल्हा क्रीडा विभागाचे या मैदानाकडे दुर्लक्ष असले तरी या मैदानाचा वापर मात्र नियमित केला जात आहे. असे असतानाही जिल्हा क्रीडा विभागाने या मैदानाची दुरवस्था सुधारण्याऐवजी आहे त्या मैदानाची अवस्थाही खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. मैदानाचा वापर क्रीडा रसिक करत असतानाही हे मैदान गृहप्रकल्प प्रदर्शनासाठी दिले होते. प्रदर्शन जरी तीन दिवस असले तरी या मैदानाचा ताबा २० दिवसांपासून प्रदर्शन आयोजकांकडे आहे. प्रदर्शनासाठी वातानुकूलित शामियाना उभारण्यात आल्याने त्याचे पिलर उभे करण्यासाठी मैदानात मोठे खड्डे खोदण्यात आले. लोखंडी कॉलम घेऊन अनेक जड वाहने या मैदानात आल्याने मैदानातील मातीत गाड्यांचे चाक रुतून मोठे खड्डे पडले आहेत. प्रवेशद्वारावरच अनेक वाहनांच्या चाकांचे ठसे उमटल्याने त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसाच प्रकार मैदानाच्या मध्यभागी झाला आहे. या ठिकाणची सर्व माती बाहेर निघाली आहे. अनेक ठिकाणी फुटलेल्या काचांचा ढीग पडलेला आहे. मैदानाच्या मध्यभागीच काचा टाकण्यात आल्याने खेळाडूंना त्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर प्लाय आणि प्लायला असलेले खिळेही मैदानात फेकून दिले आहेत. पत्र्यांची शेडही तशीच फेकून दिली आहे. कचराही तसाच टाकून ठेवला आहे. मैदानाची दुरवस्था करून ठेवलेली असतानाही या आयोजकांना कोणतीही ताकीद क्रीडा विभागाने दिलेली नाही. नाममात्र भाड्यावर हे मैदान गृहप्रदर्शनासाठी दिले. मात्र, त्यामुळे मैदानाचा केवळ गैरवापर झाल्याचे दिसत आहे. प्रदर्शनानंतर हे मैदान आता खेळाडूंसाठी धोकादायक ठरणारे आहे. तसेच मैदानाचे सपाटीकरण केल्याशिवाय ते वापरणे योग्य होणार नाही. क्रीडा संकुलाची जागा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी देताना अनेक अटी घालण्यात येतात. मात्र, या अटीच पायदळी तुडवत आयोजकांनी या मैदानाची दुरवस्था केली आहे. या प्रदर्शनानंतर या ठिकाणी सरावासाठी येणारे खेळाडू मात्र नाराज झाले आहेत.